अवैद्य गुटखा तस्करीवर स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रामीणची कार्यवाही

सह संपादक -रणजित मस्के
अमरावती
मा.श्री. विशाल आनंद, पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण यांनी अमरावती जिल्हयात गुटखा तस्करी करणा-या इसमांवर बारकाईने लक्ष देवून जास्तीत जास्त केसेस करुन गुटखा विक्रीवर आळा घालणे संदर्भात स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रामीण तसेच पोलीस स्टेशन यांना ओदशीत केले आहे.

त्या अनुषगांने दिनांक १९/०७/२०२५ रोजी स्वा.गु.शा. अमरावती ग्रामीण चे पथक पो.स्टे. मोशी हद्यीत पेट्रोलींग करित असतांना गोपनिय माहीती मिळाली की, मोशी ते वरुड रोडने इटिंगा कारने महाराष्ट्र शासन प्रतिबंधीत गुटखा अवैद्यरित्या वाहतुक करुन येणार आहे.
अशा गोपनिय खबरे वरुन स्था.गु.शा. पथक मोर्शी ते वरुड रोडवरील माळू नंदीच्या पुलाजवळ सापळा लावून बसले असता एक काळया रंगाची इटिंगा कार येत असतांना दिसली त्या इटिंगा कारला थांबुन पाहणी केली असता दोन इसम दिसून आले त्यापैकी चालक यांला त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव हाफिज खान साहेब खान वय ४२ वर्ष रा. माहूली जहागीर असे सांगितले त्यांचे इरटीगा कारची पंचासमक्ष तपासणी केली असता कारमध्ये प्रतिबंधीत सुगंधी गुटखा तंबाखू किं. ३,७१,२५०/-रु.चा माल त्यांच्या ताब्यातून मिळून आला. मानवी आरोग्यास व जिवीतास धोका करणारा सुगंधी गुटखा तंबाखू व वाहतुक करण्याकरिता वापरलेली एक काळया रंगाची इटिंगा गाडी कि. अं.९,५०,०००/रु. असा एकूण १३,२१,२५०/-रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. १) हाफिज खान साहेब खान वय ४२ वर्ष रा. माहूली जहागीर ०१ यांना पो.स्टे. मोर्शी यांचे ताब्यात देवून त्यांचेवर प्रचलित कायद्यान्वये कार्यवाही करण्यात आली आहे.
सदरची कारवाई मा.श्री. विशाल आनंद सो, पोलीस अधीक्षक अमरावती ग्रा., मा.श्री. पंकज कुमावत सौ. अप्पर पोलीस अधीक्षक, यांचे मार्गदर्शनात श्री. किरन वानखडे, पोलीस निरिक्षक स्थानिक गुन्हे शाखा, अम.ग्रा., यांचे नेतृत्वात पो.उप.नि.विशाल रोकडे व त्यांचे पथक पोहवा संतोष तेलंग, पोशी राजेश कासोटे, पोशी मारोती वैद्य, पोशी रमेश मुंडे, पोशी प्रदीप ईपर, चालक किशोर सुने तसेच ठाणेदार मोशी पो.नि. सुरज बोंडे व डि.बी. पथक यांनी संयुक्ती रित्या केलेली आहे.