अवैद्य गोवंश वाहतुक करणाऱ्यांवर अमरावती स्था. गुन्हे शाखेची विशेष कार्यवाही..

0
Spread the love

सह संपादक – रणजित मस्के

अमरावती

अमरावती ग्रामिण जिल्हयात अवैद्य गोवंश वाहतूक व विक्रीला आळा घालण्याकरीता नमेच त्यांचा ममुळ नाश करणे बाबत मा. विशाल आनंद पोलीस अधक्षक अमरावती ग्रामिण यांनी यापूर्वीच अधिनम्न सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना आदेशित केलेले आहे.

दिनांक ०८/०५/२०२५ रोजी रात्री गोपनिय माहीतीदार यांने स्थानिक गुन्हे शाखा चे विशेष पथकास माहीती दिली की, एक कंटेनर ज्याचा क्रमांक जी जे २७ टि एफ ८६४२ हा समृध्दी माहामार्गने नागपुर वरून संभाजी नगर कडे गांवश भरूण घेवून जात आहे. अशा माहीतीवरून विशेष पथक पोलीस स्टेशन दत्तापुर हददीमध्ये समृध्दी महामार्गावर वाहनाची वाट पाहत असताना सकाळी अंदाजे ४.०० वाजता वरील क्रमांकाचा ट्रक येताना दिसला. स्था.गु.शा.चे पथकास वाहनाची खात्री पटल्याने त्यांनी सदर वाहन चालकास थांबण्याचा इशारा केला. परंतु कंटेनर चालकाने वाहन न थांबवता पळून जाण्याचा प्रयत्न केला. विशेष पथकातील स्टाफ यांनी नमुद कंटेनरचा पाठलाग करून पोलीस स्टेशन नांदगाव खंडेश्वर हददीत ओवरटेक करून थांबवले. वाहनातील चालक व क्लिनर अंधगचा फायदा घेवून पळून गेले.. त्या दोघांचा अंदाजे १-२ किमी पाठलाग करून दोन पैकी एक आरोपींस पकडण्यात पथकास यश आले. तसेच सदर कंटेनर वाहन क्र जी जे २७ टि एफ ८६४२ यांची आरोपी समक्ष पाहणी केली असता त्यामध्ये ३५ गोवंश दाटीवाटीने क्रूरपणे बांधून असलेल्या स्थितीत मिळून आले. ताब्यातील आरोपी यास त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव १. मोनु राजेश कौशल वय २३ वर्ष रा. राजपुर जुना बस स्टॅन्ड जवळ तालुका सिकंदरा जि. कानपुर उत्तरप्रदेश असे सांगीतले तसेच सदर कंटेनर हा शाहरूख खान रा. लोहामंडी ट्रान्सफोर्ट नगर जयपुर राजस्थान यांचा असल्याचे सांगितले. सदर गुन्हयात ३५ गोवंश किमंत अंदाजे २,४१,००० रूपये व वाहन क्र जी जे २७ टि एफ ८६४२ किमंत अंदाजे १५,००,००० रूपये व आरोपीचे मोबाईल किंमत अंदाजे ११,००० रूपये असा एकुण १७,५२,००० रूपयाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. व ताब्यातील गोवंश गौरक्षण संस्था येथे सुरक्षा व निर्वाह करीता दाखल करण्यात आले. व आरोपी क्र १. मोनु राजेश कौशल वय २३ वर्ष रा. राजपुर जुना बस स्टॅन्ड जवळ तालुका सिकंदरा जि. कानपुर उत्तरप्रदेश व क्र.२ शाहरूख खान रा. लोहामंडी ट्रान्सफोर्ट नगर जयपुर राजस्थान यांचे विरूध्द पोलीस स्टेशन नांदगाव खंडेश्वर येथे अप क्र १४७/२५ कलम ५. ५.A(१) महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ सहकलम ११(१), ११(१) (a), ११(१) (d), ११(१)(e), ११८१५१), ११(१)(h), प्राण्याचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० सहकलम १८३,१८४,१३०(१) महाराष्ट्र मोटार वाहन अर्धािनयम १९८९ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री पंकज कुमावत (भा.पो.से.) यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांचे नेतृत्वात विशेष पथक प्रमुख पोउपनि गणेश शिंदे, त्यांचे पथक तसेच ठाणेदार नांदगाव खंडेश्वर पोनि सुनिल सोळंके, पोउपनि अमोल तुळजेवार व स्टाप यांनी संयुक्तरित्या केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट