अवैधरित्या दारूची वाहतुक करणाऱ्या दोन आरोपींवर पालघर पोलीस दलाकडून कारवाई…!

उपसंपादक : मंगेश उईके
पालघर.
श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक पालघर यांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांना पालघर जिल्हयात चालणारे अवैध धंदे, अवैधरित्या दारूची वाहतुक इत्यादीवर कारवाई करण्याबाबत सुचना दिलेल्या आहेत. त्याअनुषंगाने जव्हार पोलीस ठाणेचे पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच स्थानिक गुन्हे शाखा, पालघर येथील अधिकारी व अंमलदार हे पेट्रोलिंग करण्यासाठी रवाना झाले होते.
दिनांक ०५/०३/२०२५ रोजी खंबाळा दुरक्षेत्र हद्दीत दादरा नगरहवेली ते जव्हार या सार्वजनिक रोडवर संयुक्त रित्या पेट्रॉलिग करीत असताना मा. पोलीस उपअधिक्षक साो, यांना मिळालेल्या गोपनिय माहीती वरुन विशाल धाबा येथे पोलीस पथकासह नाकाबंदी केली असता खंबाळा दुरक्षेत्राच्या दिशेने एक तपकिरी आयशर टेम्पो क्र.जि.जे.१९ एक्स ८६९२ क्रमांकाचा टेम्पो येत असताना त्या टेम्पो मध्ये अवैध गुन्हयाचा माल असल्याबाबत संशय आल्याने नाकाबंदीस असलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी टेम्पो चालक यास टेम्पो थांबवून सदर टेम्पो चालक याचेकडे विचारपुस केली असता तसेच नाव गाव विचारले असता चालक याने त्याचे नाव बनेसिंग बद्रीलाल राठोर, वय ३६ वर्षे, रा.१५८ ग्राम सिंहसा धाररोड, ता. जि. इंदोर, राज्य मध्यप्रदेश असे सांगुन त्याचे सोबत असलेल्या इसमाने त्याचे नाव महेंद्रसिंग राजुसिंग रावत, वय २२ वर्षे, रा. टोपास, रामगड, ता. बिहावर, जि.अजमेर, राज्य राजस्थान असे सांगीतले. तसेच सदरचा टेम्पो रिकामा असुन सेलवास येथुन आलो असुन नाशिक येथे जाणार आहे असे हिंन्दी भाषेमध्ये सांगीतल्याने सदर टेम्पोची झडती घेतली असता टेम्पोच्या खालच्या भागामध्ये पत्र्याचे दोन कप्पे तयार केले असल्याचे दिसले. ते कप्पे उघडुन पाहीले असता त्या खाली दारुचे व बियरचे भरलेले बॉक्स असा एकूण १९,७०,१२०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आला. दोन्ही आरोपी यांना ताब्यात घेतले असून त्यांचेविरुध्द जव्हार पोलीस ठाणे येथे गु.रं.नं. ा ५४/२०२५ मुंबई दारुबंदी अधिनियम कलम ६५ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून गुन्ह्याचा तपास हा पोउपनि /स्वप्नील सावंतदेसाई, नेम. स्थानिक गुन्हे शाखा, पालघर हे करीत आहेत.