अवैधरित्या दारूची वाहतुक करणाऱ्या आरोपीवर पालघर पोलीस दलाकडून कारवाई..!

उपसंपादक : मंगेश उईके
पालघर.

पोलीस अधीक्षक पालघर श्री. यतिश देशमुख यांनी पालघर जिल्हयातील अवैध धंदयाचे समूळ उच्चाटन करणे बाबत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांना सक्त सुचना दिलेल्या आहेत.
दिनांक ०८/०७/२०२५ रोजी तलासरी पोलीसांना एका महिंद्रा पिकअपमध्ये अवैधरित्या दारूची वाहतुक होत असल्याची गोपणीय माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार मौजे तलासरी पाटीलपाडा, तलासरी उधवा रोडवर, ता. तलासरी जि. पालघर येथे नाकाबंदी लावून वाहने चेक करत असताना एक महिंद्रा पिकअप क्र. GJ-03-BV-2821 हि येत असताना तीस थांबवून त्यावरील चालकास नाव, पत्ता विचारले असता त्याने आपले नाव हरीचरण अर्जुन पासवान, वय ३३ वर्षे, रा. चनोदगाव, सेलवास, दादरा नगर हवेली असे सांगितले. त्याचेकडे गाडीमध्ये काय आहे याबाबत चौकशी केली असता तो उडवाउडवीचे उत्तर देऊ लागल्याने नमूद पिकअप मध्ये चेक केले असता प्रोव्हिबिशन गुन्ह्याचा दिव-दमण बनावटीची १,३८,१२०/- रूपये किंमतीची दारू मिळून आली. नमूद आरोपीकडून गाडीसह एकूण ११,३८,१२०/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीविरुध्द तलासरी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ११७/२०२५ महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस अटक करण्यात आली असून गुन्ह्याचा पुढिल तपास हा श्रेपोउपनि/जे.एम. उमतोल, नेमणुक तलासरी पोलीस ठाणे हे करीत आहेत.
सदरची कारवाई श्री. यतिश देशमुख, पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक, पालघर, श्रीमती अंकिता कणसे, उपविभागीय पोलीस अधिकारी, डहाणु विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. अजय गोरड, तलासरी पोलीस ठाणे, पोउपनि/व्ही.आर. दरगुडे, श्रेपोउपनि/जे.एम.उमतोल, सफौ/हिरामण खोटरे, पोअं/७४ कमलेश वरखंडे, पोअं/इंद्रभान लंबे सर्व नेमणुक तलासरी पोलीस ठाणे यांनी केलेली आहे.