अवैधरित्या अमंली पदार्थाची विक्री करणारा आरोपी पंजु कुजर पालघर पोलीसांकडून जेरबंद…

उप संपादक – मंगेश उईके
पालघर :-पालघर पोलीस अधीक्षक श्री. यतिश देशमुख यांनी अमंलीपदार्थ सबंधातील कारवाई करुन त्यांचे जिल्हयातुन समूळ उच्चाटन करणेबाबत पालघर जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना सुचना दिलेल्या आहेत.

त्यानुसार दि.३०/०६/२०२५ रोजी धोडीपुजा येथील मयुर थोडी चाळीत, बोईसर ता. जि. पालघर येथे अवैधरित्या अंमली पदार्थाची बेकायदेशीररित्या विक्री होत असल्याची गोपणीय माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक श्री. प्रदिप पाटील, स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांचे मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांचे पथकाने वरील नमूद ठिकाणी छापा टाकला असता आरोपी नामे पंजु समरा कुजर, वय ३५ वर्षे, रा. धोडीपुजा मयुर थोडी याची चाळ, बोईसर ता.जि. पालघर मुळ गांव मांडर, पो.ता. मांडर, जि. रांची राज्य झारखंड याचे ताब्यात १२ किलो ७८० ग्रॅम वजनाचा काळपट गडद रंगाचा कॅनबीस वनस्पतीचा उग्र दर्प असलेला एकुण १,२७,०००/- रूपये किंमतीचा गांजा हा अंमली पदार्थ बेकायदेशीररित्या विक्री करण्यासाठी कब्जात बाळगला असताना मिळून आला. सदर आरोपीविरूध्द बोईसर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. २८६/२०२५ एन.डी.पी.एस. कायदा कलम ८ (क), २० (ब), (Ⅱ) प्रमाणे दि. ०१/०७/२०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नमूद गुन्ह्यात आरोपीस अटक करण्यात आले असून गुन्ह्याचा पुढिल तपास हा पोलीस उप निरीक्षक श्री. महेंद्र गावडे, नेमणूक बोईसर पोलीस ठाणे हे करीत आहेत.
सदरची कारवाई श्री. यतिश देशमुख, पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक, पालघर यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे परि. पोलीस उप अधीक्षक, बोईसर डॉ. भागीरथी पवार, पोलीस निरीक्षक श्री. प्रदिप पाटील, सपोनि श्री. अनिल व्हटकर, पोउनि/गोरखनाथ राठोड, पोहवा/दिपक राऊत, पोहवा/संदिप सुर्यवंशी, पोहवा/संजय धांगडा, पोहवा/विजय ठाकूर, पोहवा/नरेंद्र पाटील, पोहवा/कैलास पाटील, पोअमं/प्रशांत निकम सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांनी पार पाडलेली आहे.