यवतमाळ येथील अवधूतवाडी गुन्हे प्रकटीकरण पथकाने घरफोडी करणारा आरोपी मांड्या मंगरेला ठोकल्या बेड्या..

उपसंपादक-रणजित मस्के
यवतमाळ :-यवतमाळ शहरात वाढणाऱ्या घरफोडी चे प्रमाण लक्षात घेतो मा पोलीस अधिक्षक सो यांनी घरफोडी करणारे आरोपी शोध घेवुन शहरातील होणाऱ्या चोऱ्या रोखण्यासंदर्भात आदेश दिले होते. त्या अनुषांगाने श्री नरेश रणधीर पोलीस निरीक्षक अवधुतवाडी यांनी आपले गुप्त बातमीदार यांना सर्तक करून माहीती काढली असता यवतमाळ शहरात घरफोडी करून त्यामध्ये चोरी केलेले सोने विकी साठी दोन इसम ग्राहक शोधत असल्याची माहीती मिळाल्यावरून पोलीस निरीक्षक श्री रणधीर यांनी अवधुतवाडी गुन्हे प्रकटी करण पथकाला सदर इसमाच्या मागावर पाठवुन त्यास ताब्यात घेण्यासंदर्भात आदेश दिल्याने अवधुतवाडी गुन्हेप्रकटी करण पथकाने सदर संशयीत इसमाचा शोध घेवुन त्यास ताब्यात घेतल असता त्यांचे नाव गाव पत्ता विचारले असता त्यातील एक इसम हा विधीसंघर्षग्रस्त बालक असुन दुसऱ्या इसमाचे नाव विवेक उर्फ मांडया बबन मंगरे वय १८ वर्षे व्यवसाय मजुरी रा तलावपाळी पावर हाउसच्या मागे गोरक्षण लोखंडीपुला जवळ यवतमाळ असे असुन त्याच्या कडे चोरीच्या अनुषंगाने बारकाईने चौकशी केली असता त्यानी यवतमाळ शहरात ठिकठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली आहे.

आरोपींकडुन यवतमाळ मधील एकुण ०६ घरफोडी चे गुन्हे उघडकीस आले असुन त्यापैकी अवधुतवाडी पोलीस स्टेशन चे चार आणि लोहारा पोलीस स्टेशन च्या हददीतील ०२ गुन्हे उघड झाले आहेत, यातील आरोपी कडुन गुन्हयात वापरलेल्या वाहणासह सोने चांदी चे दागीने व रोख रक्कमेसह एकूण ४,४०,००० किंमतीचा मुददेमाल जप्त केला आहे.
सदरची कामगीरी मा पोलीस अधिक्षक श्री कुमार चिंता सो तसेच मा अपर पोलीस अधिक्षक श्री पियुष जगताप सो, मा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री दिनेश बैसाने सो, पोलीस निरीक्षक श्री नरेश रणधीर यांच्या मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहा पोलीस निरीक्षक श्री रोहित चौधरी, सफौ १६९१ गजानन वाटमोडे, सफौ ६११ मेश्राम, पोहवा ११ विशाल भगत, पोहवा १५९९ बलराम शुक्ला, मपोहवा राजश्री जिददेवार, पो हवा १७०२ महेश मांगुळकर, पोहवा ३९० रवि खांदवे पोना १३९२ रूपेश ढोबळे, पोशी २४९३ कमलेश भोयर, पोशी २२६ मोहम्मद भगतवाले, पोशी ११९८ रशीद शेख, पोशी २०५६ सागर चिरडे यांनी बजावली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com