ऑटो रिक्षा चोरी करणा-या चोरास डोंबिवली पोलीसांनी अटक करुन ५०,०००/-रुपये किमंतीचा मुददेमाल हस्तगत केला…

उपसंपादक-रणजित मस्के
डोंबिवली : डोंबिवली पोलीस ठाणे हददीतील रवी पाटील ग्राउंड डोंबिवली पूर्व या ठिकाणी फिर्यादी नामे आनंद श्रीधरराव मिरजकर वय ६३ वर्षे धंदा: रिक्षा चालक रा. तुकाराम नगर गावदेवी कृपा बिल्डींग रुम नं ए / १२, रवी पाटील ग्राउंडच्या बाजुला डोंबिवली पूर्व यांनी दिनांक:- ०१/०१/२०२३ रोजी सायं ५.३०वा ते दिनांक : ०२/०१/२०२३ रोजी सकाळी ५.३०वा दरम्यान त्यांची ऑटो रिक्षा क एम.एच.०५ सीजी ७०५० ही पार्क करुन ठेवली असता कुणीतरी अज्ञात चोरटयाने वरील नमुद कालावधीत चोरी केली. म्हणुन दिलेल्या तक्रारीवरुन डोंबिवली पो ठाणे गु र कः- ०५/२०२३ कलम : – ३७९ भादंवि प्रमाणे गुन्हा
दाखल करण्यात आला.
सदर गुन्हयाचा तपास करीत असताना सपोनि योगेश सानप, पोहवा वाघ / ५०३, पोहवाः-१३०७/सरनाईक, पो.शि:- ३४०६ / राठोड, पो.शि.८४१३ / सांगळे यांनी दिनांक ०४/०१/२०२३ रोजी नमुद गुन्हा घडलेल्या परीसरात तसेच ज्या दिशेने आरोपीत गुन्हयातील चोरी केलेली ऑटो घेवुन गेला त्या मार्गाचे सीसीटीव्ही ची बारकाईने पाहणी करुन, त्या आधारे गुप्त बातमीदाराच्या मार्फतीने आरोपी नामे महेश आनंद देवाडीगा वय३५वर्षे धंदा.बेकार रा. सागर्ली डोंबिवली पूर्व यास तो राहत असलेल्या परीसरात सापळा रचुन त्यास ताब्यात घेवुन, त्याने नमुद गुन्हयातील चोरी गेलेली एम. एच:- ०५ सी. जी : – ७०५० ही हस्तगत केली.
सदरची कामगिरी मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – ३, कल्याण श्री. सचिन गुंजाळ साो, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग श्री. सुनिल कुराडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सचिन सांडभोर सो, पोनि / तडवी साो यांचे मार्गदर्शनाखाली डोंबिवली पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि योगेश सानप, पोहवा : – ५०३ / विशाल वाघ, पोहवा – १३०७ / प्रशांत सरनाईक, पो.ना. ४५७ / दिलीप कोती पो. अं ३४०६ / शिवाजी राठोड, पो. अं ८४१३ / नितीन सांगळे, पोअं ३९९८ / पाटील यांनी कामगिरी केली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

