खुनाचा प्रयत्न व जबरी चोरीतील फरार असले रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापूर यानी केली अटक.

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

कोल्हापूर :-

राजारामपुरी पोलीस ठाणे गु.र.नं. ३३१/२०२४ भा.द.वि.स. कलम ३९४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दिनांक ०६/०६/२०२४ रोजी दाखल आहे. सदर गुन्हातील आरोपी नामे विश्वनाथ उर्फ बिल्डर सौदागर कांबळे, रा. राजेंद्रनगर कोल्हापूर तसेच कागल पोलीस ठाणे गु.र.नं. ४०४/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम १०९, ११८ [२], ११५ [२], ३ [५] सह भारतीय हत्यार अधिनियम कलम ४, २५ प्रमाणे गुन्हा दिनांक ०४/११/२०२४ रोजी दाखल आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी नामे सद्दाम देसाई, रा. विक्रम नगर, कोल्हापूर हे दोन्ही आरोपी गुन्हे दाखल झालेपासून मिळून येत नव्हते. सदरचे दोन्ही गुन्हे गंभीर स्वरूपाचे असलेने आरोपींचा शोध घेणेबाबत मा. पोलीस अधीक्षक, श्री. महेंद्र पंडीत यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर यांना सुचना दिल्या होत्या.

मा. पोलीस अधीक्षक, श्री. महेंद्र पंडीत यांनी दिले सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहायक पोलीस निरीक्षक, चेतन मसुटगे, पोलीस अंमलदार वैभव पाटील, प्रविण पाटील, विशाल खराडे, योगेश गोसावी, संतोष बरगे, गजानन गुरव, प्रदिप पाटील, महेंद्र कोरवी, परशुराम गुजरे, अशोक पोवार यांचे तपास पथक नेमले. सदर तपास पथक वरील दोन्ही आरोपींचा शोध घेत असताना त्यांना गोपनीय बातमी मिळाली की, आरोपी विश्वनाथ उर्फ बिल्डर सौदागर कांबळे हा शेंडा पार्क चौक येथे व आरोपी सद्दाम देसाई हा कोंडाओळ, लक्ष्मीपूरी येथे येणार आहे. अशी बातमी मिळाली असता वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी दोन वेगवेगळी पथके तयार करून सापळे लावले असता शेंडा पार्क चौक येथुन विश्वनाथ उर्फ बिल्डर सौदागर कांबळे, वय २४ वर्षे, रा. राजेंद्रनगर कोल्हापूर यास ताब्यात घेतले. त्यास गुन्ह्याचे पुढील तपासकामी राजारामपूरी पोलीस ठाणेस हजर केले असून नमुद गुन्ह्यामध्ये त्यास अटक करण्यात आली आहे.

तसेच कोंडाओळ, लक्ष्मीपूरी येथुन सद्दाम हुसेन नाजीर देसाई, वय ३२ वर्षे, रा. विक्रम नगर, कोल्हापूर यास ताब्यात घेतले. त्यास गुन्ह्याचे पुढील तपासकामी कागल पोलीस ठाणेस हजर केले असून नमुद गुन्ह्यामध्ये त्यास अटक करण्यात आली आहे.

सदरची कामगीरी मा.पोलीस अधीक्षक, श्री. महेंद्र पंडित साो, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर, सहायक पोलीस निरीक्षक, चेतन मसुटगे, पोलीस अंमलदार वैभव पाटील, प्रविण पाटील, विशाल खराडे, योगेश गोसावी, संतोष बरगे, गजानन गुरव, प्रदिप पाटील, महेंद्र कोरवी, परशुराम गुजरे, अशोक पोवार यांनी केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट