अट्टल गुन्हेगार श्रींकात ताडेपकर एक वर्षासाठी स्थानबध्द पाठलाग करुन जालना स्था. गुन्हे शाखेची कारवाई


सह संपादक -रणजित मस्के
जालना
जालना जिल्ह्यात शरीराविरुध्दचे व मालाविरुध्दचे गुन्हे करणारे रेकॉर्डवरील गुन्हेगार सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवुन दहशत निर्माण करीत असल्याने, त्यांचे विरुध्द महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, औषधीद्रव्ये विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत चे अधिनियमानुसार स्थानबध्दतेची कारवाई करण्यात येते. इसम नामे श्रीकांत ऊर्फ शिऱ्या त्रऋषीकुमार ताडेपकर रा.सरस्वती मंदीराजवळ, खरपुडी रोड जालना हा सुध्दा तलवार व घातक हत्याराचे जोरावर वेगवेगळे गुन्हे करुन सामाजीक सुव्यवस्था बिघडवत असल्याने, श्री. सुरेश उणवणे (तात्कालीन प्रभारी अधिकारी तालुका जालना) यांनी त्याचा स्थानबध्दतेचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक, कार्यालयामार्फत मा. जिल्हादंडाधिकारी, जालना यांचेकडे पाठविला होता.
मा. जिल्हादंडाधिकारी जालना यांनी श्रीकांत ऊर्फ शिऱ्या त्रऋषीकुमार ताडेपकर रा. सरस्वती मंदीराजवळ खरपुडी रोड जालना यांनी प्रस्तावास मंजुरी देवुन नमुद आरोपीस 01 वर्षाकरीता मध्यवर्ती कारागृह हर्सल येथे स्थानबध्द करणे बाबतचे आदेश निर्गमीत केले आहे. चार महिन्यापासुन सदर आरोपी हा त्याचा मोबाईल बदं करुन वेगवेगळया ठिकाणी त्याचे अस्तित्व लपवीत होता. वेळोवेळी त्याचा शोध घेवुन सुध्दा तो मिळुन येत नव्हता.
आज दिनांक 24/06/2025 रोजी सदर इसम हा एका वाहनात बसुन जालना शहरात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला प्राप्त झाल्याने, त्याचा शोध घेत असतांना, सदर इसम हा पोलीसांना पाहुन पळु लागला तेंव्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याचा एक ते दीड कि. मी. पाठलाग करुन त्यांला विशाल कॉर्नर जालना येथुन ताब्यात घेतले आहे. त्यास स्थानबध्दतेच्या कारवाईसाठी पोलीस ठाणे तालुका जालना येथे सुपुर्द करण्यात आले असुन त्यास 01 वर्षाकरीता हर्सल कारागृह ठेवण्यात येणार आहे.
अशा प्रकारचे गुन्हें करुन सामाजीक सुव्यवस्था बिघडविणारे आरोपीविरुध्द MPDA. कायद्यार्तगत स्थानबध्दतेची तसेच हद्यपारीची कारवाई करण्यात येणार आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. अजय कुमार बंसल व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अनंत कुलकर्णी, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. पंकज जाधव, सहायक पोलीस निरीक्षक, योगेश उबाळे, पोउपनि. राजेंद्र वाघ, पोउपनि. भगवान नरोडे पो.स्टे. अंबड, पोलीस अंमलदार विजय डिक्कर, भाऊराव गायके, रुस्तुम जैवाळ, प्रशांत लॉखंडे, फुलचंद गव्हाणे, संभाजी तनपुरे, रमेश काळे, सोपान क्षीरसागर, सचीन राऊत, योगेश सहाणे, धीरज भोसले सर्व स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी केलेली आहे