अट्टल घरफोड्या करणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव यांनी केले गजाआड…

सह संपादक -रणजित मस्के
धाराशिव

मा. पोलीस अधिक्षक श्रीमती रितु खोखर, अपर पोलीस अधिक्षक श्रीमती शफकत आमना यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार यांचे आदेशावरुन सपोनि श्री. अमोल मोरे, सपोनि श्री. सचिन खटके, पोह/ विनोद जानराव, समाधान वाघमारे, नितीन जाधवर, पोना/बबन जाधवर, चापोह /महेबुब अरब प्रकाश बोईनवाड, विनायक दहीहंडे, असे धाराशिव जिल्ह्यातील मालाविषयी गन्ह्यातील आरोपीचा शोध घेवून मालाविषयी गुन्हे उघडकीस आणणे व पाहिजे फरारी आरोपीचा शोध घेण्याकामी पेट्रोलिंग करत असताना पथकास गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, आरोपी नामे कृष्णा उर्फ खडेल शिंदे रा. मुरुड ता.जि. लातुर याने धाराशिव जिल्ह्यातील चोरी व घरफोडीचे अनेक गुन्हे केलेले आहेत. व ते वाठवडा शिवारात एका हॉटेल समोर थांबलेला आहे. त्यावरुन पथकाने नमुद ठिकाणी मिळालेल्या बातमी प्रमाणे जावून आरोपीचा शोध घेतला असता आरोपीस पोलीसांचा संशय येताच त्याने तेथुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु पथकाने नमुद आरोपीस पकडून ताब्यात घेवून त्याचे कडे चौकशी केली असता नमुद आरोपीने त्याचे इतर दोन साथीदारासह मिळून धाराशिव शहर, ढोकी, वाशी, परंडा, लोहारा, आनंदनगर, धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत मागील एक वर्षा पासून अनेक घरफोड्या केल्या असल्याचे सांगितले. तसेच त्याच्या कडे नमुद गुन्ह्यातील मालाबाबत विचारणा केली असता त्याने सागिंतले की, प्रत्येक गुन्हा केल्या नंतर आम्ही मिळालेल्या सोन्याचे दागिने किंवा पैसे याची वाटणी करीत होतो. त्यामधून माझ्या वाटणीला आलेले सोन्याचे दागिने हे मी राहत असलेल्या मुरुम येथील घरी ठेवलेले आहेत. त्यावरुन पथकाने नमुद आरोपीच्या ताब्यातुन साडे आठ तोळे (84 ग्रॅम वजनाचे) सोन्याचे दागिने व गुन्हा करताना वापरलेली मोटारसायकल असा एकुण 3,87,000₹ किंमतीचा माल जप्त करुन पुढील कार्यवाही कामी गुन्ह्यातीलमुद्देमालासह आरोपीस पोलीस ठाणे आनंदनगर येथे हजर केले आहे. नमुद आरोपी यांचे कडून धाराशिव जिल्ह्यातील घरफोडीचे एकुण 15 गुन्हे उघड केले आहेत.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक श्रीमती रितु खोखर व अपर पोलीस अधिक्षक श्रीमती शफकत आमना, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार, सपोनि श्री. अमोल मोरे, सपोनि श्री. सचिन खटके, अंगुलीमुद्रा शाखेचे सपोनि श्री. सुधीर कराळे, पोलीस हवालदार/ विनोद जानराव, समाधान वाघमारे, नितीन जाधवर, पोलीस नाईक / बबन जाधवर, योगेश कोळी, अंगुलीमुद्रा शाखा पोह/ मनोज जगताप, चापोह/महेबुब अरब, प्रकाश बोईनवाड, विनायक दहीहंडे यांचे पथकाने केली आहे.