अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभुमीवर पालघर जिल्ह्यातील सुरक्षा अधिक बळकट करणे करीता मॉक ड्रिल राबविलेबाबत.

उपसंपादक : मंगेश उईके
पालघर
अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभुमीवर पालघर जिल्ह्यातील महत्वाचे आस्थापना, संवेदनशिल लॅन्डींग पॉइंट, बंदरे, मर्मस्थळे, कोस्टल चेकपोस्ट, मॉल या ठिकाणी सुरक्षा सतर्कता तपासणे करीता ऑपरेशन ब्लु ईगल (मॉक ड्रील) हे श्री. यतिश देशमुख, पोलीस अधीक्षक, पालघर यांचे मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.


पालघर येथील रिलायन्स मॉल या ठिकाणी (डमी) अतिरेक्यांनी हल्ला केला आहे असे तेथील मॅनेजर यांनी फोन करून पालघर पोलीस नियंत्रण कक्ष येथे कळविले. त्यानंतर नियंत्रण कक्ष, पालघर यांनी सदर संदेश सर्व पोलीस ठाणे, सर्व वरीष्ठ अधिकारी यांना देण्यात आला. सदर संदेशाप्रमाणे तात्काळ रिलायन्स मॉल, पालघर येथे मॉक ड्रील राबविण्यात आली.
सदर ड्रीलमध्ये श्री. विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. अभिजीत धाराशिवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, पालघर विभाग, श्री. किशोर मानभाव, पोलीस निरीक्षक, सुरक्षा शाखा, पालघर, श्री. अनंत पराड, पोलीस निरीक्षक, पालघर पोलीस ठाणे, पालघर पोलीस ठाणेचे पोलीस अंमलदार, पोलीस मुख्यालय, पालघर येथील जलद प्रतिसाद पथक (QRT) तसेच दंगल नियंत्रण पथक (RCB) मधील पोलीस अधिकारी व अंमलदार, बी.डी.डी.एस. चे अधिकारी व अंमलदार सहभागी होते. सदरची मॉक ड्रिल आज दिनांक ०४/०७/२०२५ रोजी ११.३० ते १२.४० वाजता दरम्यान रिलायन्स मॉल, पालघर येथे पार पडली.