उमरेड जिल्हा- नागपूर येथील अट्टल मोटार सायकल चोरटे स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस पथकाच्या जाळ्यात…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया :– जिल्ह्यांतील व जिल्ह्याबाहेरील चोरीच्या एकूण 18 मोटार सायकली किंमती 11 लक्ष 40 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत गुन्ह्यांत जप्त..

स्थानिक गुन्हे शाखेच्या व पो.स्टे. तिरोडा पोलीस पथकाची कारवाई-

अट्टल मो. सा. मुख्य… चोरटा इसम नामे.. विक्की वसंता रामटेके, वय 27 वर्ष, रा. मंगळवारी पेठ, उमरेड, ता. उमरेड, जि. नागपूर व

आरोपी नामे-
2) विक्रम रामेश्वर उके, वय 42 वर्ष, रा. नारायण नगर, मोहड ले आऊट, उमरेड, ता. उमरेड, जि. नागपूर

असे ताब्यात घेवून जेरबंद करण्यात आलेल्या आरोपीतांची नावे आहेत..

मोटार सायकल चोरी करण्याची कार्यपद्धती.-
यातील मुख्य आरोपी हा मोटार सायकली चोरी करण्यासाठी रेल्वे मार्गाने येऊन, बसस्टैंड, कोर्ट, आठवडी बाजार व पाकींग तसेच ईतर गदर्दीच्या ठिकाणी उभ्या केलेल्या मोटार सायकली चोरुन न्यायचा,व चोरीच्या मोटार सायकलींच्या नंबर प्लेट बदलवून बनावट आर. सी. तयार करून लोकांना विक्री करायचा

मोटार सायकल चोरी गुन्हयाची उकल कार्य पध्दती-. जिल्ह्यात घडलेल्या मो.सा. चोरीच्या गुन्ह्यांतील गुन्हेगारांची गुन्हे करण्याची पद्धत, मो.सा. चोरीच्या गुन्हेगाराचे तांत्रिक विष्लेषन, तसेच गोपनीय माहितीगार यांचे कडील प्राप्त माहितीवरुन चोरी च्या मोटार सायकली हस्तगत करण्यात आलेल्या असुन स्थानिक गुन्हे शाखेच्या गोंदिया पथकास चोरीच्या मो. सा. हस्तगत करण्यात मोठे यश आले आहे..

याबाबात थोड्क्यात माहिती अशी की, पोलीस अधीक्षक गोंदिया श्री. गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, यांनी जिल्ह्यातील मोटर सायकल चोरीच्या घटनांची गंभीर दखल घेऊन मोटर सायकल चोरी करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांना जेरबंद करून गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याच्या सुचना दिल्या होत्या.

या अनुषंगाने पो.नि. स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया यांनी वेगवेगळी पथके तयार करून, त्यांना गुन्हे संबंधाने गोपनीय माहिती संकलीत करणे, जिल्हा व जिल्ह्या बाहेरील गुन्हेगारांची माहिती काढून त्यांचे हालचालीवर बारीक लक्ष ठेवणे, तांत्रीक स्वरुपातील बाबी व गुन्हेगारांचा अभिलेख पडताळणे बाबत सुचनात्मक मार्गदर्शन केले… मोटार सायकल चोरीच्या समांतर तपासा मध्ये तिरोडा येथील दाखल गुन्ह्यामध्ये वरील आरोपीतांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झालयाने नमूद आरोपी यांना ताब्यात घेण्यात आले… तिरोडा येथील दाखल गुन्हा व जिल्ह्यातील, जील्हाबहेरील मो.सा. चोरीच्या गून्ह्या संबंधाने सखोल चौकशी विचारपूस केली असता नमूद मुख्य आरोपी याने तिरोडा हद्दीतील वडेगाव, नवेझरी, एकोडी तसेच जिल्हा भंडारा, चंद्रपूर, नागपूर इत्यादी जिल्हयातुन मो. सा. चोरी केल्याचे सांगितले. तसेच चोरीच्या मोटार सायकल वर असलेले प्रत्यक्ष नंबर प्लेट बदलवून बनावट आर. सी. तयार करून लोकांना विक्री केल्याचे सांगितले….यावरून मुख्य आरोपी विक्की रामटेके व त्याचा सोबती यांचे ताब्यातून, व लोकांना फसवून विक्री केलेल्या मो.सा. अश्या एकूण 18 चोरीच्या मो. सा. गुन्ह्यांत हस्तगत करून जप्त करण्यात आलेल्या आहेत…जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील मो. सा. चोरीच्या गुन्ह्यांची यशस्वी उकल करण्यास स्था.गु.शा. पथकास यश आले आहे… गुन्ह्यात जप्त मो.सा. मुद्देमाल व आरोपी यांना तिरोडा पोलीसांचे स्वाधीन करण्यात आले आहे..

मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने व गुन्ह्यांत ईतर आरोपी सहभाग बावत तपास शोध-

मा. पोलीस अधीक्षक गोंदिया आणि अप्पर पोलीस अधीक्षक गोंदिया यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. श्रो.दिनेश लबडे, यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांकडून अधीकचा समांतर तपास करण्यात येत आहे. नमुद आरोपी पो. ठाणे तिरोडा यांच्या ताब्यात असून, पुढील तपास उपिभागीय पोलीस अधिकारी श्री. साहील झरकर यांचे मार्गदर्शनात पो. नि. पो. स्टे.तिरोडा यांच्या कडून करण्यात येत आहे.

🔹 सदरची कामगिरी श्री. गोरख भामरे, पोलीस अधीक्षक, गोंदिया श्री. नित्यानंद झा, अपर पोलीस अधीक्षक गोंदिया, कॅम्प देवरी यांचे निर्देशान्वये श्री. साहील झरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी,तिरोडा यांचे निर्देश, आदेशाने व मार्गदर्शनाखाली, पो.नि. श्री. दिनेश लबडे, स्था. गु. शा. पो.नि.श्री. अमीत वानखेडे, पोलीस अंमलदार- प्रकाश गायधने, इंद्रजित बिसेन, सुबोध बिसेन, दुर्गेश तिवारी, सुजित हलमारे, छगन विठ्ठले, सर्व नेमूणक – स्थागुशा यांनी अथक परिश्रम प्रयत्नांनी कामगिरी बजावली तसेच तिरोडा येथील पोलीस पथक यांनी सुध्दा कारवाई दरम्यान मोलाचे सहकार्य केले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट