साताऱ्यात पाटखळ माथा येथे कॅनॉल मध्ये मिळुन आलेल्या बेवारस प्रेताची ओळख पटवुन त्यावरून तीन संशयितांना ताब्यात घेवुन अटक- सातारा तालुका पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांची धडक कारवाई…

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

सातारा :-

दिनांक 9/08/20023 रोजी दुपारचे सुमारास मौजे पाटखळ माथा ता. जि. सातारा येथून जात असले कण्हेर डावा कॅनॉलमध्ये एक अनोळखी पुरुष जातीचे प्रेत मिळून आलेबाबत दिले तक्रारीवरून सातारा तालुका पोलीस ठाणेस अकस्मात मयत रजिस्टर नं.77/2023 सौ. आर. पी. सी 174 प्रमाणे दि. 09/08/2023 रोजी दाखल आहेत्यानंतर सदर प्रेताचे सिव्हील हॉस्पीटल सातारा येथील फॉरेन्सीक तज्ञ डॉ. राहुल खाडे, वैद्यकीय अकारी को हिरास यांनी पोस्टमार्टन केले आहे. सदर मयतेतील अनोळखी पुरुष जातीच्या प्रेताचे दोन्ही पाय बांधले असल्याने सदर प्रकार हा घातपाताचा असल्याची शंका आलेने सदर मयतेची ओळख पटविणेकामी मा.वरिष्ठांनी दिले सुचनांप्रमाणे पोलीस ठाणेकडील पथक तयार करणेत आले होते. पोलीसांनी सदर अनोळखी पुरुष जातीचे प्रेताची ओळख पटविण्याचे अनुषंगाने गोपनीय माहिती प्राप्त करुन सदर मयतातील पुरुष जातीचे प्रेताची ओळख पटविलो असता सदरचे प्रेत हे खेड ता. जि. सातारा येथील शरद मधुकर पवार याचे असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. त्यानंतर पोलीसांनी सदर मयताचा घातपात केलेबाबत गोपनिय माहिती प्राप्त केली असता सदर शरद पवार याचे बावधन येथील महिलेशी प्रेमसंबंध असल्याची माहिती प्राप्त झाली तसेच त्यावरून मयत शरद पवार वले किडगांव ता.जि.सातारा येथील संशयिताची मागील काही दिवसापूर्वी भांडणे झाली असल्याचे माहिती पोलीसांना प्राप्त झालेने पोलीसांनी संशयितांना ताब्यात घेऊन त्यांचेकडे सदर मयताचे अनुषंगाने चौकशी केली असता संशयितांनी मयत नामे शरद मधुकर पवार वय 37 वर्षे रा. खेड ता.जि. सातारा याचा वाडे ता.जि. सातारा गावचे मध्ये दिनांक 05/08/2023 रोजी खुन करुन त्यास जवळच असले कण्हेरचे डावे कॅनॉलमध्ये टाकुन दिली असल्याचे कबुली दिली आहे. त्यानुसार सदर मयतेच्या चौकशीवरुन व तपासावरुन सातारा तालुका पोलीस स्टेशनला मयत नामे शरद मधुकर पवार याचा खुन केले बाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे व सदर गुन्हयाचे तपासामध्ये एकूण तीन आरोपीना अटक करण्यात आली आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक सो, समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक सो बापु बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी सौ. किरणकुमार सुर्यवंशी सातारा शहर विभाग सातारा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरून देवकर, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके सातारा तालुका पोलीस ठाणे, तसेच सातारा तालुका पोलीस ठाणे कडील पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील स्थागुशा सातारा. पो. हवा दादा परीहार, पोहया संदीप आवळे, पो. हवा सचिन घोरपडे, पोना मालोजी चव्हाण, पो.ना पंकज ढाणे, पो.ना. राजु शिखरे, पो.ना तुकाराम पवार, पो.ना शिंदे, पो.ना शतिश बाबर, पो.शि. गजानन फडतरे, पो.शि. शिवाजी डफळे, पो.शि. रोहीत बाबर, तसेच स्थानिक गुन्हे शाखेकडील पोहवा शरद बेबले, पो. हा लैलेश फडतरे, पो. ना अरुन पाटील, पो. शि राहीत निकम यांनी केलेली आहे. सदर गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक श्री विश्वजीत घोडके सातारा तालुका पोलीस ठाणे है करीत आहेत. सदर कारवाई मुळे वरीष्ठ अधिकारी यांनी सातारा तालुका पोलीस ठाणेचे अधिकारी व अमलदार यांचे अभिनंदन केलेले आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट