श्री गणेश मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी श्री कालकाई देवी क्रिकेट संघ तर्फे आसवले प्रीमियर लीगचे आयोजन संपन्न…

संपादिका – दिप्ती भोगल
ठाणे : कळवा:- श्री कलकाई देवी क्रिकेट संघाने
आसवले प्रीमियर लीग २०२४ पर्व -१ चे दिनांक ४/२/२०२४, कळवा येतील पटणी मैदानात आयोजित केले होते.


या लीग मध्ये ८ संघांच समावेश होता अगदी लहानपासुन वय वर्ष १२ ते ६० वर्ष असलेल्या सर्वांनी सहभागी होऊन खेळण्याचा आनंद लुटला . या मागचा हेतू एकच होता की या मध्यमातून निधी गोळा करून गणेश मंदिराच्या जीर्णोद्धार साठी थोडी मदत व्हावी , तसेच गावातील नवीन आणि तरुण मुलांमध्ये असलेल्या कलेची जाणीव व्हावी, तसेचं खेळातून थोड शारीरिक व्यायाम व्हावा . मुंबई सारख्या धक्काधक्कीच्या जीवनात कोणालाच वेळ नसतो तरी विरंगुळा म्हणून प्रत्येक खेळाडू आपल्या टी शर्ट ट्रॅक पँट वेशात मोठ्या संख्येने उपस्थित राहिले .त्यामुळे खूपच छान वाटत होत , क्रिकेट हे एक असे माध्यम आहे जे आपल्याला एकमेकांना जोडून ठेवतो . गावाची एकजूट कायम रहावी तरुण पिढी जी कायम मुंबईत असतात त्यांना गावाची ओढ निर्माण व्हावी आपल्या गावाचे महत्त्व कळावे हाच हेतु .

मुख्य उद्दिष्ट
१ ) गणेश मंदिर जीर्णोद्दार मदत
२) शारीरिक व्यायाम तसेच तंदुरुस्त राहायला मदत
३) नवीन मुलां मधील कला अवगत व्हावी कलेला अजून वावं मिळावी
४ ) क्रिकेट मुळे एकी आणि एकमेकांचा सहवास
५ ) उत्तम नियोजन तसेच उत्कृष्ट सहकार्य
६ ) मेहनत , चिकाटी , जिद्द
७) विजेते संघांची उत्तम कामगिरी .
यावेळी
अंतिम विजेता संघ:- शौर्य -११ (संघ मालक शैलेश हरावडे)
उपविजेता संघ:- ए के वॉरियर्स (संघ मालक श्री अनंत काप) हे ठरले.
मायभूमी फाऊंडेशन टीम मार्फत प्रथमोपचार व सामने ठरल्यापासून वेळोवेळी सर्वांना त्रास होऊ नये म्हणून व्यायाम करा जॉगिंग करा वॉर्म अप असे सतत ग्रुपच्या माध्यमातून योग्य मार्गदर्शन
टीप:- आठ संघ आणि गावातील जेवढे खेळाडू होते त्या सर्वांची फळी तयार करण्यात आली त्याप्रमाणे सर्व खेळाडू चिठ्या उडऊन विभाजन करून सर्वांना समसमान खेळाडू देण्यात आले त्यामुळे सर्वजण खुश होऊन आम्हीच जिंकणार अस आवर्जून सांगत होते कोण मस्करी करत होते कोण confidance मध्ये प्रत्येकाची कमकुवत बाजू काय ? बळकट बाजू काय? याचा विचार सतत व कधि चार तारखेचा रविवार उजाडतोय याची वाट सर्वजण पाहत होते. जोश मध्ये सर्वजण तयारी करत होते .काय घेऊ ? काय नको घेऊ ? एक वेगळं वातावरण तयार झाले होते. याचा आनंद मात्र सर्वांनी सकाळी सात -आठ वाजल्यापासून ते शेवटपर्यंत कायम होता हरले म्हणुन घरी गेले असे सुध्दा घडले नाही त्यामुळे एक वेगळाच क्षण अनुभवायला मिळाला आणि हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com