सहायक पोलीस आयुक्त श्री. शेखर बागडे, गुन्हे शाखा, ठाणे शहर यांना भारत सरकार गृहमंत्रालय कडुन ‘केंद्रीय दक्षता पदक’ देवुन सन्मानीत केलेबाबत..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

ठाणे :-दि.०९/११/२०२२ रोजी इसम नामे रणजीत झा रा.डोंबीवली यांनी त्यांचा मुलगा नामे रूद्र वय ११ वर्षे यास कोणीतरी अज्ञात इसमाने पळवुन नेले असुन रूद्र यास सोडवायचे असेल तर दिड करोड रू. दे नाहीतर तुझ्या मुलाला जिवे ठार मारून टाकीन असे धमकवल्याबाबत मानपाडा पोलीस ठाण्यात खबर दिली. सदर तकारीचे गांभीर्य ओळखुन मानपाडा पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शेखर बागडे यांनी तात्काळ मानपाडा पोलीस स्टेशन गु.र.न ८५४/२०२२ भा.द.वि. कलम ३६३,३६४, (अ),३८५,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करून वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली ४ वेगवेगळी पथके तयार केली, सदर पथकांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदार यांचे मदतीने तपास केला असता, गुन्हयातील संशयीत इसम हे सुरत गुजरात येथील एका व्यक्तीच्या संपर्कात असल्याचे तपासात आढळुन आले. सदर व्यक्तीस पोलीसांनी ताब्यात घेवुन तपास केला असता अपहृत मुलगा रूद्र यास सुरत गुजरात येथील एका घरात बांधुन ठेवले असल्याचे आढळुन आले. सदर वेळी पोलीसांनी तात्काळ सदर घरावर छापा मारून अपहृत मुलगा रूद्र याची सुखरूप सुटका करून, ५ आरोपींना अटक केली आहे. तसेच अटक आरोपींकडुन गुन्हयात वापरलेले वाहन, मोबाईल फोन, शस्त्रे जप्त केली आहेत व सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे.

अशाप्रकारे प्रस्तुत गुन्हयात कोणताही सुगावा नसताना अवघ्या ७४ तासात पोलीस निरीक्षक श्री. शेखर बागडे आणि त्यांचे पथकाने अपहृत मुलगा रूद्र झा यास अपहरण कार्याच्या तावडतीतुन गुजरात येथुन सुखरूप सोडवुन सदर गुन्हयातील सर्व आरोपी अटक केले आहे. तसेच अटक आरोपीविरूध्द सबळ पुरावा गोळा करून त्यांचे विरूध्द मा. न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले आहे. सदरचा गुन्हा सध्या न्यायप्रविष्ठ आहे. पोलीसांनी समयसुचकता दाखवुन तत्परतेने केलेल्या उत्कृष्ट तपासाबाबत मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी विधानसभेत त्यांची प्रशंसा केली आहे.

वरील कामगिरी बद्दल दि. ३१/१०/२०२४ रोजी भारत सरकार गृहमंत्रालय कडुन सदर गुन्हयाचा तपासाबाबत सहायक पोलीस आयुक्त श्री. शेखर बागडे गुन्हे शाखा ठाणे शहर यांना ‘केंद्रीय दक्षता पदक’ जाहीर करून सन्मानीत करण्यात आले असून मा. पोलीस आयुक्त श्री. आशुतोष डुंबरे, मा. पोलीस सह आयुक्त श्री. ज्ञानेश्वर चव्हाण, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंजाबराव उगले, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. शिवराज पाटील व ठाणे शहर पोलीस दलातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. शेखर बागडे यांचे अभिनंदन केले आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट