आश्रम शाळांना प्रथम उपचार औषध संचाचे वाटप

उपसंपादक-मंगेश उईके
पालघर
दि 5 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प ,जव्हार व ओएनजी सीएसआर आणि सीएसआर एनजीओ यांच्या संयुक्त विद्यमानाने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार अंतर्गत 30 शासकीय व 18 अनुदानित आश्रम शाळांना विद्यार्थ्यांच्या प्रथम उपचाराकरिता प्रथम उपचार औषध संच वाटप करण्यात आले.


या प्रथम उपचारासाठी प्राप्त औषध संचामुळे किरकोळ दुखापत, ताप ,पोटदुखी इत्यादी बाबीवर तात्काळ प्रथमोपचार करणे शाळास्तरावर शक्य होणार आहे.
या कार्यक्रम प्रसंगी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण पाटील ,
प्रकल्प कार्यालयाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) सुभाष परदेशी ,सीए सीआर एनजीओ चे प्रतिनिधी नितीन वदवानी तसेच
सर्व विस्तार अधिकारी उपस्थित होते आरोग्य विभागामार्फत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी प्रथम उपचारासाठी औषधाचा वापर कसा करावा याबाबत सविस्तर असे प्रशिक्षण उपस्थित अधीक्षक , अधिक्षिका यांना दिले औषध उपचारांसाठी संच मिळवून देण्याकरिता प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी करिष्मा नायर व सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रशासन दिपक टिके यांनी मौलाची भूमिका बजावली आहे.
सामाजिक संस्थांकडून प्रथम उपचारासाठी औषधे मिळाल्यामुळे अधीक्षक, अधीक्षिका यांनी संबंधित संस्थेचे आभार मानले