पोलीस अधीक्षकांचे निर्देशान्वये आमगाव अंतर्गत कार्यक्षेत्रातील 4 अट्टल गुन्हेगारांवर हद्दपारीचे कारवाईचा दणका…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया :- नवरात्रोत्सव, दिवाळी सण आणि आगामी विधानसभा निवडणुकी च्या पार्श्वभूमीवर हद्दपारीची कारवाई* …

उपविभागीय दंडाधिकारी, देवरी यांचे आदेशान्वये पो. ठाणे आमगाव हद्दीतील आणखी 4 कुख्यात गुन्हेगार 2 महिन्यांसाठी आमगाव उपविभाग, देवरी तालुका, सालेकसा तालुक्यातून हद्दपार..

आमगाव पो. ठाण्यांतर्गत हद्दीतील अट्टल गुन्हेगार नामे -*

1) चंद्रकांत गणेश बोरकर, वय 22, रु. माणेकसा, ता. आमगाव जि. गोंदिया

२) अभिषेक वासुदेव फुंडे, वय २६ वर्षे, रु. बोथली ता. आमगाव जि. गोंदिया

३) धर्मेंद्र उर्फ ​​कोल्या रामचंद मेश्राम , वय ३५ वर्षे, रु. रिसामा, ता. आमगाव, जि. गोंदिया*

4) सुनीता उर्फ ​​रोशनी राजकुमार उर्फ ​​राकेश शेंडे वय 43 हिने रु. तिगाव, ता. आमगाव, जि. गोंदिया

अशी हद्दपार करण्यात आलेल्या अट्टल गुन्हेगारांची नावे असुन चौघांनाही आमगांव उपविभाग अंतर्गत हद्दीतुन तसेच तालुका देवरी, सालेकसा हद्दीतुन दोन महिण्याकरिता हद्दपार करण्यात आले आहे.

मा. पोलीस अधिक्षक साो. गोंदिया यांचे निर्देशान्वये जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नवरात्रोत्सव व आगामी दिवाळी सण, होणारी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सार्वजनिक शांतता, सुव्यवस्था अबाधित राहावी, वाढत्या गुन्हेगारी ला आळा बसावा, गुन्हेगारावर वचक रहावा, तसेच गुन्हेगाराचे गुन्हेगारी प्रवृत्तींना कोणताही थारा दिला जात नाही हा संदेश जनमानसात जावा म्हणुन कारवाई करण्यात आली आहे.

अट्टल गुन्हेगार नामे- 1) चंद्रकांत गणेश बोरकर रा. मानेकसा, याचेविरुद्द अवैधरित्या देशी दारु बाळगुन विक्री करणे, गावात दहशत निर्माण करुन लोकांना धमकाविणे, मारपिट करणे, अल्पवयीन मुलीचा विनंयभंग करणे, शिविगाळ व धमकी देणे अशा सदराखाली ४ गंभीर गुन्हे पो.स्टे. आमगांव येथे दाखल आहेत.

2) अभिषेक वासुदेव फुंडे रा. बोथली हा काहीही कामधंदा करीत नाही. स्त्रियांना शिविगाळ व धमकी देवुन छेळछाड करणारा,सराईत मारामारी करणारा, परिवारासोबत भांडन, मारपिट करणारा, चोरी करणारा असुन त्याचेविरुद्द पोलीस स्टेशन आमगांव येथे ४ गंभीर गुन्हे नोंद आहेत.

3) धर्मेंद्र उर्फ कोल्या रामचंद मेश्राम रा. रिसामा, हा कोणताही कामधंदा करित नसुन अवैधरित्या दारु विक्री करणे, चोरी करणे, रात्रीचे वेळी घरफोडी करणे, दारू पिऊन शिवीगाळ करणे आरडाओरडा करणे असे पो.स्टे. आमगांव येथे त्याचेविरुद्ध ५ गुन्हे नोंद असुन एका गुन्ह्यात मा. न्यायालयातुन ५००/- रु दंड व १५ दिवस शिक्षा झालेली आहे.

4) ग.भा. सुनिता ऊर्फ रोशनी राजकुमार ऊर्फ राकेश शेन्डे रा. तिगांव, ही कोणताही कामधंदा करित नसुन तिचे विरुद्ध अवैधरित्या दारुविक्रीचे ५ गुन्हे नोंद असुन सदर महिला ही अवैधरित्या दारु विक्रीचे काम करुन ऐशो आरामाचे जिवन जगत आहे. तिच्या अवैध दारु विक्रीमुळे मौजा तिगाव येथिल प्रतिष्ठीत तसेच जेष्ठ नागरिकांना, गावातील मुली/मुले, महीलांना सुध्दा दारु पिणाऱ्या लोकांमुळे त्रास होत असतो.पिणा-यांमध्ये आपआपसात ब-याच वेळा भांडणे, वाद होवुन दारु पिणारे लोक अपशब्द वापरतात त्यांचा विपरीत परीणाम शाळेत जाणा-या येणा-या विद्यार्थांच्या तसेच चौकात बैठकीत असलेल्या प्रतिष्ठीत व जेष्ठ नागरिकांच्या मनावर होत आहे. तसेच गावातील लोकांनाही त्याचा उपद्रव होत असतो.

अशा नमुद अट्टल गुन्हेगारी प्रवृत्ती च्या धोकादायक इसमांच्या कृत्यावर पायबंद घालण्यासाठी त्यांचे विरुद्द पोलीस निरिक्षक पोलीस स्टेशन आमगांव यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ५६(१) (अ) (ब) अन्वये हद्दपार प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी देवरी यांना सादर केलेला होता. उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी देवरी यांच्या आदेशान्वये उपविभागीय पोलीस अधिकारी सा. आमगांव यांनी विहित मुदतीत चारही हद्दपार प्रस्तावाची प्राथमिक चौकशी पुर्ण करुन नमुद सराईत गुन्हेगारांना गोंदिया, भंडारा, गडचिरोली या जिल्हा हद्दीतुन २ वर्षाकरिता हद्दपार करण्याची शिफारस केली होती.

अखेर मा. उपविभागीय दंडाधिकारी देवरी कविता गायकवाड यांनी नमुद चारही सराईत गुन्हेगाराचे हद्दपारीचे आदेश काढुन ०२ महिण्याच्या कालावधी करिता आमगांव उपविभाग अंतर्गत हद्दीतुन तसेच तालुका देवरी, सालेकसा हद्दीतुन हद्दपार केले आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. गोरख भामरे, साहेब, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, गोंदिया कॅम्प देवरी, उपविभागीय पोलीस अधिकारी, आमगाव श्री.प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.श्री. तिरुपती राणे, पोलीस स्टेशन आमगाव, पो.नि. श्री.दिनेश लबडे, स्थागुशा यांचे मार्गदर्शनात पोलीस अंमलदार यशोदा नाईक, विनिशा बहेकार, राजु गजपुरे, योगेश उईके, खुशालचंद बर्वे, ममता दसरे,लिखिराम दसरे, राजु पंधरे, निलेश भजने, शुभम शेंडे, गौरव बुराडे, स्वप्निल शेंडे पो. स्टे आमगाव यांनी तसेच प्रतिबंधक विभाग स्थागुशा गोंदिया येथील- मपोउपनि वानिता सायकर, प्रकाश गायधने, दुर्गेश तिवारी यांनी सदरची कार्यवाही पार पाडली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट