मा. भारत निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार तसेच आदर्श आचारसंहिता यांचे पालन करणेकामी अहोरात्र प्रयत्न करून विधानसभा निवडणुक २०२४ सांगली जिल्हयातील ८ मतदारसंघात शांततेत व निर्भिड वातावरणात पार ..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

सांगली :-विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ अनुषंगाने एकूण ६८९९ इसमांवर प्रतिबंधात्मक कारवाई
करण्यात आलेली आहे.

४५ पाहिजे आरोपी व ६ फरारी आरोपी पकडण्यात आलेले आहेत. आचारसंहिता सुरू झाल्यापासून १०२३ नॉन बेलेबल वॉरटची बजावणी करण्यात आलेली आहे.

जिल्हयात एकूण २४०३
परवानाधारक शस्त्रे असून २२२ सवलत मिळालेली शस्त्रे वगळून सर्व शस्त्रे अनामत करण्यात आलेली आहेत.

जिल्हयात निवडणुक अनुषंगाने शांतता कमिटीच्या ३३. पोलीस मित्र-३१ व १५ जनता दरबार घेण्यात आलेले आहेत. स्थानिक पोलीस ठाणे व सीएपीएफ असे संयुक्त ३५७ रूट मार्च व १५६ दंगा काबू योजना राबविण्यात आलेल्या आहेत.

विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ अनुषंगाने आचारसंहिता लागू झालेपासून आतापर्यंत ९१४२.६५ लिटर अवैध दारू, २९.६७३ किलो गांजा, ३३४२.७९८ किलो गुटखा व ५९ शस्त्रे जप्त करण्यात आले आहेत. एकूण २,०४,८२,७८९ किमतींच्या जप्तीची कारवाई करण्यात आलेली असून ३७१ गुन्हे दाखल करण्यात आलेले
आहेत. निवडणुक आचारसंहिता कालावधीमध्ये १,०३,५४,७०० रूपये रोख रक्कम जप्त करण्यात आलेली आहे.

विधानसभा निवडणुक २०२४ मध्ये आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याने १० दखलपात्र गुन्हे व १० अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. गुन्हयाचा तपास सुरू असून मुदतीत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे.

विधानसभा निवडणुक २०२४ करीता एकूण ९ निमलष्करी (केंद्रीय व राज्य) दलाच्या तुकडया
बंदोबस्ताकरीता पुरविण्यात आलेल्या होत्या. जिल्हयात एकूण ७२.१२ टक्के मतदान झाले असून पोलीस विभागातील ८६ टक्के अधिकारी व अंमलदार यांनी पोस्टल बॅलेटद्वारे मतदानाचा हक्क बजावलेला आहे.

मतदारांना प्रलोभन देवून कोणत्याही प्रकारचे मोफत वस्तूंचे वाटप होवू नये याकरीता ड्रोन कॅमेऱ्याद्वारे लक्ष ठेवण्यात आले होते.

जिल्हयात दि.१६.१०.२०२४ रोजीपासून ९ १६ इंटीग्रेटेड चेकपोस्ट कार्यान्वीत करण्यात आलेले होते.

तसेच आंतरराज्य सिमेवरील सर्व रस्ते निवडणुकीच्या ७२ तास आगोदर सील करण्यात आले होते. जिल्हयात निवडणुक प्रचारासाठी येणाऱ्या सर्व व्हीव्हीआयपी यांना कॅटेगरीनुसार सुरक्षा व्यवस्था
देण्यात आलेली होती. त्यामुळे आचारसंहिता कालावधीत प्रचारादरम्यान कोणताही अनुचीत प्रकार घडलेला नाही.

विधानसभा निवडणुक कालावधीतमध्ये पोलीस नियंत्रण कक्ष, डायल ११२ व सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष यांनी समन्वयाने कामकाज करून तात्काळ कार्यवाही करण्यात आली.

जिल्हयामध्ये पोलीस ठाणे हद्दीमध्ये सेक्टर पेट्रोलींग ठेवून चोख गस्त ठेवण्यात आली होती. बिनतारी संदेश प्रणालीद्वारे सर्व दुर्गम, संवेदनशील भागात संपर्क ठेवण्यात आला होता.

मोटर परिवहन विभाग सांगली येथील ३७० तसेच आवश्यकतेनुसार वाहनांचे अधिग्रहण करून दळण- वळण व्यवस्था सुरळीत ठेवण्यात आली होती.

सांगली जिल्हयात एकूण २४८२ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया ही शांततेत, सुरळीत, पारदर्शक व निर्भीड वातारवणात पार पडली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *