पालघर येथे पोलीस शिपाई भरती २०२१ च्या अनुषंगाने “जनसंवाद अभियान” अंतर्गत उमेदवार यांचेकरीता मार्गदर्शन शिबीराचे आयोजन…

प्रतिनिधी-रणजित मस्के
पालघर: आगामी पोलीस भरती २०२१ च्या अनुषंगाने श्री बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर यांचे संकल्पनेतून चालू असलेल्या “जनसंवाद अभियाना” अंतर्गत पालघर जिल्ह्यातील तरुणांना पोलीस भरती प्रक्रियेविषयीची माहिती मिळावी याकरीता दि.२२/१२/२०२२ रोजी सकाळी १०.३० वाजता जिल्हा नियोजन समीती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर या ठिकाणी पोलीस शिपाई भरतीच्या अनुषंगाने मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा असल्याने पोलीस भरती विषयी स्थानिक तरुणांना माहिती नसल्याने व स्थानिक उमेदवार हे जास्तीत जास्त प्रमाणात पोलीस भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होता यावे हा “जनसंवाद अभियान” उपक्रमा अंतर्गत राबविण्यात आलेल्या शिबीराचा मुख्य उद्देश होता. याकरीता पालघर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून एकूण ४५० उमेदवार यांनी सहभाग नोंदविला.


सदर कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिजाऊ सामाजीक व शैक्षणिक संस्था, झाडपोली, विक्रमगड येथील श्री. गणेश सांबरे, श्री. अरविंद देशमुख, व श्री. साईनाथ केदार हे लाभले होते.
उपस्थित सर्व उमेदवार यांना श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. पंकज शिरसाठ, अपर पोलीस अधीक्षक पालघर, श्री. शैलेश काळे, पोलीस उप अधीक्षक (गृह) पालघर यांनी बहुमुल्य मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या.
पोलीस दलात भरती होण्यासाठी उमेदवारांना मैदानी चाचणी व लेखी परीक्षा चाचणी अशा प्रकारच्या प्रक्रियेतून जावे लागते. त्याअनुषंगाने भरतीसाठी लागणारे कागदपत्र, मैदानी चाचणीतील प्रकार व लेखी परीक्षेची तयारी याविषयी या शिबीरात श्री. गणेश सांबरे, श्री. अरविंद देशमुख, व श्री. साईनाथ केदार यांनी मार्गदर्शन केले.
सदरचा कार्यक्रम हा श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक पालघर, श्री. पंकज शिरसाठ, अपर पोलीस अधीक्षक पालघर, श्री. शैलेश काळे, पोलीस उप अधीक्षक (गृह) पालघर, तसेच पालघर जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या उपस्थितीत पार पडला.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com