चॅपटर केस केली म्हणून फिर्यादी महिलेला दगडीने मारहाण करणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल…

उपसंपादक- राकेश देशमुख
महाड:– बुधवार दिनांक २७ सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी ठिक ०७ : ३० वाजताच्या सुमारास मौजे ढालकाठी बेलदार वाडी येथील राहते घराचे बाहेरील अंगणात ता.महाड, जि.रायगड येथे फिर्यादी सौ.उषा अनिल चव्हाण वय ३० वर्षे यानी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी अनिल लहु चव्हाण वय ३२ वर्ष रहाणार मुळ इंदिरानगर, भीमदिप वसाहत, कॅनरा बँक समोर, बिबवेवाडी, पुणे याने त्याच्या विरोधात सौ.उषा हिने अदखलपात्र गुन्हा दाखल केला व त्याला चॅपटर केस करिता महाड तहसीलदार कार्यालय येथे पाठविण्यात आले असता त्या गोष्टीचा राग मनात धरून आरोपीत याने खबर देणार हीस माझेवर तु पोलीस ठाण्यात केस केलीस आता खल्लास करतो अशी धमकी हाथाबुकयाने मारहाण करून घराचे बाहेरील अंगणात असलेल्या दगडीने मारहाण करुन खबर देणार यांचे उजवे मांडिला ,पायाला व डाव्या बाजूचे कुशीवर दगडाने मारून दुखापत केली म्हणून याची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्री. आंधळे यांनी घटनास्थळी भेट देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी विरोधात कलम ३२४,३२३,५०४,५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा अधिक तपास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक श्री. ईकबाल शेख करीत आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com