आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन-गोरगरिबांसाठी जीवन संजीवनी( जितेंद्र पाटील )

0
Spread the love

सह संपादक -रणजित मस्के

मुंबई :

महाराष्ट्रातून विविध आजारांचे रुग्ण रोजच्या रोज मुंबई,ठाणे जिल्ह्यात येत असतात.अशा गरजू रुग्णांना आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशनच्या माध्यमातून विविध योजनेच्या व ट्रस्टच्या हॉस्पिटल्समध्ये दाखल करण्याचं काम जितेन्द्र पाटील यांच्या माध्यमातून गेल्या १० वर्षांपासून केलं जात आहे.

ह्या संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत २०,००० हून अधिक रुग्णांची मोफत तपासणी,औषधोपचार, व विविध नामवंत हॉस्पिटल्समध्ये शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.त्यामुळे रुग्णांना नव जीवन प्राप्त झाले आहे.

आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशनच्या माध्यमातून ब्लड डोनेशन कॅम्प व मोफत आरोग्य तपासणी,उपचार व शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन आजमितीपर्यंत महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात करण्यात आले आहे.त्यामुळे राज्यभर जितेंद्र पाटील यांची आरोग्यदूत म्हणून ओळख आहे.

संपर्क कार्यलय : अनंत सुधा भवन, शॉप नं 2,. श्री नवीनसेठ गवळी यांचा संपर्क कार्यालय बाजूला, चक्की नाका, कल्याण ( ईस्ट )

याशिवाय आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशनच्या माध्यमातून विविध प्रकारचे सामाजिक उपक्रमही राबवण्यात आले आहेत अनाथ व बेघर मुलांसाठी दैनंदिन लागणारे साहित्य, वह्या व पुस्तकांचे वाटप करणे तसेच अन्नदान करण्याचं कार्य सातत्याने चालू असते,त्यात कधीच खंड पडत नसणे,ही अतुलनीय व स्तुत्य गोष्ट आहे.

ह्या संस्थेचे सर्वेसर्वा असलेले जितेंद्र केवलसिंग पाटील यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी तालुका पातळीपासून ते थेट राष्ट्रीय पातळीपर्यंतचे पुरस्कार मिळालेले आहेत.यात प्रामुख्याने 1 ) आंतरराष्ट्रीय रेड स्वस्तिक सोसायटी मुंबई कडून “बेस्ट अच्युमेंट अवॉर्ड 2018” 2)भोपाल “आंतरराष्ट्रीय ग्लोबल अचिव्हर्स 2019” 3) कुवेत “हुनर रत्न अवॉर्ड 2021 ” 4 ) कुवेत “आरोग्य दूत पुरस्कार 2024 ” असे ४ आतरराष्ट्रीय व १४२ राष्ट्रीय पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले,याचा आम्हा
खान्देशवासियांना सार्थ अभिमान आहे.

सदर फाउंडेशनच्या माध्यमातून जितेंद्र पाटील यांनी अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविलेले आहेत. यात राज्यात जागोजागी आरोग्य शिबीर भरविणे व गरजूंची मोफत ऑपरेशन करून देणे,अनाथाश्रमातील मुलांना दैनंदिन लागणारे साहित्य व भोजन देण्याचं कार्य,अपंगांना जयपूर फूट कॅलिपर,सायकल वाटप करणे,रस्त्यावरील बेवारस रुग्णांना मदत करणे त्याचप्रमाणे गोरगरीब रुग्णांना मोफत ऑपरेशन साठी खाजगी व सरकारी हॉस्पिटलमध्ये मदत करणे इत्यादी समाजसेवेची कामे आरोग्यदूत जितेंद्र पाटील सातत्याने करत आहेत.याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन अन् पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

साऱ्या जगाला हादरून सोडणाऱ्या कोरोना महामारीच्या काळात रस्त्यावर राहणारे बेरोजगार कामगार,धुणी-भांडी करणाऱ्या मोलकरीण,हातपोटावर जीवन जगणारे हातगाडीवाले मजूर अशा सुमारे ७०० लोकांना दिवस रात्रीचे भोजन देत अन्नदान केले.तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढविणारे अर्सेनिकम अल्बम-३० औषधी २० हजाराहून जास्त लोकांना वाटप केले,वेळप्रसंगी आर्थिक सहाय्यही केले.

समाजातल्या गोरगरीब,निराधार,गरजू लोकांसाठी तनमनधनाने कार्य करणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील ता, एरंडोल येथील जितेंद्रसिंग पाटील यांचा वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.आपणास आई जगदंबे वैद्यकीय सेवा करण्यासाठी मोठं बळ देवो,ही चरणी प्रार्थना👏 पाटीलसरांचा वाढदिवस विविध आरोग्यविषयक कार्यक्रम राबवुन कल्याणनगरीत साजरा करण्याचा निर्धार संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आल्याचे फौंडेशनचे सहसचिव संदिप ब्रम्हे यांनी कळविले आहे. स्थानिक नागरिकांनी त्याचा अवश्य लाभ घ्यावा,असे आवाहन करण्यात येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट