आर्मीतील जवान असल्याचे सांगून लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणाऱ्यास सिंहगड पोलीसांनी ठोकल्या बेड्या..

पुणे : शनिवारवाडा परिसर येथे एका फिर्यादी महिलेस सोडून सैन्य दलाच्या वर्दीचा गैरवापर करुन महिलेला भुरळ पाडून लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या लष्करातील एका भामटयास सिंहगड पोलिसांनी अटक केली आहे.
त्याची कसून तपास केला असता त्याच्याविरूद्ध पुणे, नगर, लातूरमध्ये फसवणूकीचे 5 गुन्हे उघडकीस आले आहेत. प्रशांत भाऊराव पाटील वय ३१ वर्षे रा. कुंपटगिरी ता. खानापूर जि.बेळगाव असे अटक केलेल्याचे भामटयाचे नाव आहे. शादी डाॅट काॅम या वेबसाईटद्वारे प्रशांतने पुण्यातील एका महिलेसोबत ओळख वाढवून लग्नाच्या आमिष दाखविले. तिला श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती मंदिरात भेटायला बोलावले. ती मंदिरात आल्यानंतर त्याने महिलेला सैन्य दलात नोकरीला असून मी सच्चा देशभक्त असल्याचे भासविले.
त्या महीलेला आपण आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात गणपती दर्शन घेऊन करु असे सांगितले. तेथून त्याने ड्रेस बदलायचा आहे, असे सांगून तिला कारमधून नवले पुलजवळील एका लॉजवर नेले.
आम्ही देशासाठी दिवसरात्र दहशतवाद्यांशी लढतो असे बोलून भावनिक करुन तिच्यावर अत्याचार केला. महिलेने आरडाओरडा करु नये म्हणून त्याने सैन्य दलाच्या वर्दीची शपथ तिला घातली. त्यानंतर तिला गाडीत बसवून आपल्याला कर्तव्यावर जायचे आहे असे सांगून महिलेला शनिवारवाडा परिसरात सोडून तो निघून गेला.
त्यानंतर या महिलेने त्याला फोन करण्याचा प्रयत्न केल्यावर त्याने तिचा फोन ब्लॉक केल्याचे आढळून आले. त्यामुळे फिर्यादी यांना संशय आल्यामुळे तिने सिंहगड रोड पोलिसाकडे फिर्याद दिली.
लष्कराचा संबंध असल्याने सिंहगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकिशोर आणि पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी पथकाला तपासाच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक कुलदिप संकपाळ, पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी आणि शंकर कुंभार यांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपीचा माग काढून पथक नगरला गेले. तेथे आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने सैन्य दलात भरती झाल्यानंतर २०१८ पासून कर्तव्यावर रुजु झाला नसल्याचे सांगितले. त्याशिवाय २०१८ पासून नोव्हेंबर २०२१ पर्यंत त्याने पुणे, नगर, लातुर याठिकाणी फसवणुकीचे ५ गुन्हे केल्याची कबुली दिली. आरोपी प्रशांत पाटील याला न्यायालयाने १ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे अशा प्रकारच्या फसवणूकी कोणी करत असेल तर सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाचे आव्हान सिंहगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी केली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
dipakbhogal@surakshapolicetimes.com