“सशस्त्र दुरक्षेत्र गोठणगांव तर्फे आदिवासी आश्रम शाळा गोठणगांव येथील विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक सहलीचे आयोजन”…

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :– मा. श्री. निखील पिंगळे, पोलीस अधिक्षक गोंदिया, यांचे संकल्पनेतून आणि श्री. नित्यानंद झा, अपर पोलीस अधिक्षक गोंदिया कॅम्प देवरी, श्री संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग देवरी, यांचे मार्गदर्शनाखाली सशस्त्र दुरक्षेत्र गोठणगांव तर्फे कम्युनिटी पोलीसींग , दादालोरा एक खिडकी योजनेअंतर्गत विविध उपक्रम आयोजित केले जातात.

त्याचाच एक भाग म्हणून दि.२९/०१/२०२४ ते दि.३१/०१/२०२४ पर्यंत दिनदयाल उपाध्याय आदिवासी आश्रम शाळा गोठणगांव येथील इयत्ता ८ वी ते १० वी च्या एकुण ७८ विद्याथ्यांकरीता स.दु. गोठणगांव, भारत राखीव बटालीयन-०२ गोंदिया व जीवन आधार बहुउद्देशीय सामाजिक संस्था नागपुर यांच्या संयुक्त विद्यमानाने तीन दिवशीय शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले.

सहलीदरम्यान विद्यार्थ्यांची नागपुर येथील शालीनीताई मेघे हॉस्पीटल येथे निशुल्क संपुर्ण वैद्यकीय तपासणी करुन घेण्यात आली. रमन सायन्स सेंटर येथे भेट देऊन विज्ञानावर आधारीत विविध प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. त्यानंतर दिक्षाभुमीला भेट देण्यात आली. विद्यार्थ्यांकरिता विशेष मेट्रो बुक करण्यात येऊन लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन ते सीताबर्डी मेट्रो स्टेशन पर्यंत मेट्रो सफर करण्यात आली. सदर मेट्रो प्रवासादरम्यान भाराब-०२ गोंदियाचे समादेशक श्री. अमोल गायकवाड .व जीवन आधार बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री जीवन जवंजाळ यांनी विद्यार्थ्याची भेट घेऊन विद्यार्थ्यांशी हितगुज साधले.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सशस्त्र दुरक्षेत्र गोठणगांवचे प्रभारी अधिकारी श्री. सचिन घाटे, पोउपनि शुभम नवले, तसेच IRB चे पोउपनि सुनिल चव्हाण , पोलीस नाईक अरविंद वालदे पो. शि. रत्नशिल मेश्राम तसेच दिनदयाल उपाध्याय आदिवासी आश्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री. मेश्राम सर यांनी परिश्रम घेतले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com