सशस्त्र दरोडयाचे तयारीत असणाऱ्या ४ आरोपीस सातारा पोलीसानी ठोकल्या बेडया…

0
Spread the love

सह संपादक- रणजित मस्के

सातारा :-अटक करुन त्यांचे ताब्यातून २ दुचाकीसह २ पिस्टल, ५ जिवंत काडतुसे, ४ रिकाम्या पंगळ्या व धारधार हत्यारे अशी ४,४१,२००/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.

श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती वैशाली कड़कर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी सातारा जिल्हयामध्ये घडणाऱ्या गंभीर गुन्हयांवर नियंत्रण आणण्याकरीता ठोस व प्रभावी कार्यवाही करण्याच्या सुचना सर्व पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना दिलेल्या आहेत.

दिनांक २०/०२/२०२५ रोजी सातारा शहर पोलीस ठाणेकडील शाहूनगर परिसरामध्ये बीट मार्शल २ यांना डायल ११२ वरुन संपर्क साधून माहिती देण्यात आली की, अजिंक्यतारा किल्ल्याचे पायथ्याला असणारे मंगळाई मंदिराकडे जाणारे रोडचे समोर असलेल्या मैदानामध्ये काही इसम जमले असून ते दरोडा टाकण्याच्या तयारीमध्ये आहेत, अशी माहिती मिळताच बीट मार्शल २ वर कार्यरत असणारे पोलीस अंमलदार तात्काळ प्राप्त माहितीच्या ठिकाणी रवाना झाले. तेथे गेल्यानंतर त्यांना काही इसम उभे असल्याचे दिसले. त्यातील नमुद इसमांच्या हातामध्ये लोखंडी सुऱ्या सारखी हत्यारे दिसल्याने त्यांनी पोलीस नियंत्रण कक्ष सातारा येथे स्थानिक गुन्हे शाखा व गुन्हे प्रकटीकरण विभाग येथील जादा मनुष्यबळ घटनास्थळी पाठविण्याबाबत कळविले. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा व गुन्हे प्रकटीकरण विभाग येथील पोलीस अधिकारी व अंमलदार तात्काळ घटनास्थळी रवाना झाले व घटनास्थळावर हजर असणारे १) अनुज चिंतामणी पाटील वय २१ वर्षे, रा.२६७ गुरुवारपेठ सातारा, २) दिप भास्कर मालुसरे वय १९ वर्षे रा.१६४ गुरुवारपेठ शिर्के शाळेजवळ सातारा, ३) आनंद शेखर जाधव उर्फ जर्मनी वय २५ वर्षे रा. हनुमाननगर इचलकरंजी कोल्हापूर, ४) अक्षय अशोक कुंडूगळे वय २५ वर्षे रा. जवाहरनगर इचलकरंजी कोल्हापूर, ५) क्षितीज विजय खंडाईत रा. गुरुवारपेठ सातारा या इसमांना ताब्यात घेवून त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचे कब्जात २ देशी बनावटीची पिस्टल, ५ जिवंत काडतुसे, ४ रिकाम्या पुंगळवा, २ मोटार सायकल, २ लोखंडी सुरे, मोबाईल हॅन्डसेट असा एकूण ४,४१,२००/- रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला असून त्याबाबत नमुद इसमांचेकडे विचारपूस करता, ते सातारा शहरातील सोन्याचे दुकान फोडून सोने चोरी करणार होते असे सांगीतल्याने त्यांचेविरुध्द सातारा शहर पोलीस ठाणे गु.र.नं. १६६/२०२५ भा.न्या.सं.क.३१०(४), ३१०(५) सह भारतीय

हत्यार अधिनियम २०१९ चे कलम ३, २५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

नमूद गुन्हयाचे तपासामध्ये यातील आरोपी अनुज चिंतामणी पाटील याचेकडे विचारपूस करता त्याचे सांगणे की, दि. २०/११/२०२४ रोजी विधानसभा निवडणुकीचे मतदान झाले त्यावेळी निलेश वसंत लेवे व पप्पू लेवे या दोघांची भांडणे झाली होती त्यावेळी निलेश लेवे याचे वडील वसंत लेवे (आण्णा) यांना धीरज ढाणे व त्याच्या मित्रांनी मारले होते याचा राग मनात धरुन निलेश वसंत लेवे याने आरोपी अनुश चिंतामणी पाटील यास धीरज ढाणे याचा गेम करण्यासाठी २०,००,०००/- रुपयांची सुपारी दिली होती, त्याकरीता निलेश लेवे याने अनुश पाटील यास २,००,०००/- रुपये अॅडव्हान्स दिलेला होता असे निष्पन्न झाल्याने नमूद गुन्हयास भारतीय न्याय संहिता कलम ६१(२), सह भारतीय हत्यार अधिनियम २०१९ चे कलम ७, २७ अशी कलम वाढ करुन आरोपी ६) निलेश वसंत लेवे रा. चिमणपुरा पेठ सातारा, ७) विशाल राजेंद्र सावंत रा.टिटवेवाडी ता. जि. सातारा यांना गुन्हयाचे कामी अटक करण्यात आलेली आहेत.

माहे नोव्हेंबर २०२२ पासून ११७ देशी बनावटीची पिस्टल, ४ बाराबोअर रायफल, २ रायफल, २६६ जिवंत काडतुसे, ३८८ रिकामी काडतुसे, ५ रिकामे मॅग्झीन जप्त करण्यात आलेली आहेत.

श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण देवकर स्थानिक गुन्हे शाखा सातारा, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के सातारा शहर पोलीस ठाणे, सहायक पोलीस निरीक्षक शाम काळे, शिवाजी भोसले, दत्तात्रय दराडे, रोहित फाणें, पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, विश्वास शिंगाडे, परितोष दातीर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार विजय कांधळे, संजय शिर्के, शरद बेबले, लैलेश फडतरे, अजय जाधव, प्रविण फडतरे, अविनाश चव्हाण, स्वप्नील कुंभार, अरुण पाटील, गणेश कापरे, ओंकार यादव, सचिन ससाणे, विशाल पवार, रोहित निकम, रविराज वर्णेकर, मोनाली निकम, अनुराधा सणस, सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार श्रीनिवास देशमुख, राहुल घाडगे, सुजित भोसले, पंकज मोहिते, इरफान मुलाणी, विनायक मानवी, तुषार भोसले, सागर गायकवाड, होमगार्ड इंगळे यांनी केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट