पालघर विभागात जहाजातून समुद्रा मार्गे आलेेले अंमली पदार्थ ड्रग्ज हे लवकरात लवकर पोलीस ठाण्यात जमा करण्याचे नागरिकांना आवाहन..!

0
Spread the love

प्रतिनिधी-मंगेश उईके

पालघर:- पालघर पोलीसांकडून सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते कि, खोल समुद्रात काही काळापुर्वी अंमली पदार्थ ड्रग्ज जहाजातून वाहीले आहे ते समुद्र किणारी लागले आहे ठाणे , पालघर जिल्याचे समुद्र किना-यालगत अंमली पदार्थ समुद्रामार्गे वाहत येवून समुद्र किना-यालगत आल्याचे या पुर्वीच निदर्शनास आले आहेत.

सदरचे अंमली पदार्थ पालघर जिल्ह्यात काही मासेमारी करणाऱ्या नागरीकांना मिळाल्याचा संशय आहे. तश्या तपासण्या चालू आहेत काही मासेमारी बांधव लालसेपोटी सदर अंमली पदार्थ हे विक्री करण्याचा प्रयत्न करत असल्याचे पोलीसांना गोपनिय रीत्या कळत आहे.

तरी सर्व नागरीक आणि विशेषतः मच्छिमार बांधवांना विनंती आहे की सदरचे अंमली पदार्थ कोणासही मिळून आले असल्यास तात्काळ आपल्या जवळच्या पोलीस ठाण्यात जमा करावे किंवा आपल्या गावचे पोलीस पाटील अथवा सरपंच यांना माहिती दयावी त्यांचे सोबत समक्ष पोलीसांकडे जमा करावे.

माहिती देणाऱ्या अथवा अंमली पदार्थ जमा करणारे व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. त्यांचे विरूद्ध कोणतीही कारवाई होणार नाही.

असे मा.पोलीस अधिक्षक सो पालघर यांनी कळवले आहे ,परंतु कोणी सदरचे अंमली पदार्थ तसेच ठेवून घेतले साठवले , विक्री करण्याचा प्रयत्न केल्यास त्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल . NDPS Act अन्वये तो गंभीर गुन्हा असून त्यास जन्म ठेप , कमीत कमी दहा वर्षे शिक्षेची तरतूद आहे याची नोंद घ्यावी.अशी माहिती मा.पोलीस निरीक्षक श्री. दत्तात्रय किंद्रे
प्रभारी अधिकारी पालघर पोलीस ठाणे यांनी दिली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट