राज्यस्तरीय आदर्श शिक्षक व जिल्हास्तरीय आदर्श शाळा पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन…

उपसंपादक-रणजित मस्के
बार्शी : सोलापूर :- ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्था बार्शी ता.बार्शी जि.सोलापूर ही एक महाराष्ट्र शासन नोंदणीकृत संस्था असून सामाजिक,शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहे.
सदर संस्थेच्या वतीने शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे शिक्षक आणि शाळांचा सन्मान शिक्षक दिनानिमित्त दरवर्षी केला जातो. याही वर्षी 5 सप्टेंबर 2024 शिक्षक दिनानिमित्त राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार आणि जिल्हास्तरीय आदर्श शाळा पुरस्कार देण्यात येणार आहेत.
सदर राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी शासन मान्यता प्राप्त प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांकडून पुरस्कारासाठी प्रस्ताव मागवण्यात येत आहेत. तसेच सोलापूर जिल्ह्यातील जिल्हास्तरीय आदर्श शाळा पुरस्कारासाठी शासन मान्यता प्राप्त शाळांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
सदर प्रस्ताव ऑफलाइन आणि ऑनलाईन पीडीएफ स्वरूपामध्ये सादर करता येणार आहेत. सदर प्रस्ताव 5 ऑक्टोबर 2024 पर्यंत सादर करणे. हा पुरस्कार सोहळा दिनांक 13 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता
माननीय श्री अमृत नाना राऊत यांच्या माऊली लॉन्स, रेल्वे स्टेशन रोड बार्शी जि. सोलापूर येथे संपन्न होणार आहे.याबाबत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री राहुल वाणी सर मो.नं. 9423087020 व संस्थेचे सहसचिव श्री नागनाथ सोनवणे मो.नं. 9271726186 यांनी पात्र शिक्षक व शाळांनी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन केले आहे.
शिक्षक व शाळांनी प्रस्ताव पाठवण्यासाठी वरील दोन मोबाईल नंबरवर संपर्क साधून वेळेत प्रस्ताव पाठवावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com