आंतरजिल्हा गांजा तस्करी करणारे एकुण ४ आरोपी वाघोली पोलीस स्टेशनचे ताब्यात

पुणे
सह संपादक – रणजित मस्के
४.७७१ किलो गांजा व एक मोपेड मोटार सायकलसह एकुण १,०४,००१ रु. किं. चा मुद्देमाल जप्त
दि.२६/०२/२०२५ रोजी रात्रौ ०१.१५ वा.चे सुमा वाघोली पोलीस स्टेशनचे उपास पथकाचे अधिकारी वैजीनाथ केदार, सहा. पोलीस निरीक्षक अहिरे व इतर स्टाफ असे गोरे वस्ती, भावडी रोड वाघोली येथे पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार मोटे यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून तीन आरोपी व एक विधी संघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेवून पोलीस अंमलदार प्रदिप मोटे यांचे फिर्यादी वरुन वाघोली पोलीस स्टेशन पुणे येथे गु.र.नं.३८/२०२५, एन.डी.पी. एस. अॅक्ट कलम ८ (क), २०(ब) (ii) (अ) अन्वये गुन्हा दाखल केला असुन दाखल गुन्ह्याचा तपास सपोनि अहिरे करीत आहेत.
दाखल गुन्हयाचे तपासात १) नागेश सुनिल लष्करे, वय २० वर्ष, २) सौरभ नामदेवराव तपासे, वय २२ वर्षे, ३) रिझवान इस्माईल शेख, वय ३९ वर्षे, ४) विधी संघर्षग्रस्त बालक त्यांचे कडुन एकुण १,०४,००१/-रु. किंमतीचा ४ किलो ७७१ वजनाचा गांजा व १ मोपेड मोटार सायकल जप्त केली आहे.
सदरची कामगीरी, मा. पोलीस उप आयुक्त, परीमंडळ ४, पुणे शहर, श्री. हिंम्मत जाधव, मा. सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग पुणे शहर श्रीमती प्रांजली सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक वाघोली पोलीस ठाणे, श्री. पंडीत रेजितवाड, सहा. पो. निरी. विनायक आहीरे, पो. उप निरी. वैजीनाथ केदार, परि.पो.उप.निरी. सुवर्णा इंगळे, पोलीस अंमलदार कर्णवर, मोटे, माने, कोकरे, रोकडे, गायकवाड, वाघ, बोयणे, कुंभार, आव्हाळे यांनी केली