कापूरबावडी ठाणे येथे एवलॉन वेलनेस फॅमिली स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या कुंटणखान्यावर खंडणी विरोधी पथकाची कारवाई…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

ठाणे :-हाई स्ट्रिट मॉल, कापुरबावडी जंक्शन, ठाणे येथे एवलॉन वेलनेस फॅमिली स्पा सेंटर येथे स्पा सेंटर नावाखाली सुरू असलेल्या कुंटणखाण्यावर कारवाई करून ७ बळीत महिलांची खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे शहर कडून सुटका करण्यात आली आहे.

ठाणे शहर परिसरातील हाई स्ट्रिट मॉल, कापुरवावडी जंक्शन, ठाणे येथे एवलॉन वेलनेस फॅमिली स्पा सेंटर येथे स्पा सेंटर च्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सपोआ/श्री. शेखर बागडे, शोध १. गुन्हे शाखा, ठाणे शहर यांना मिळालेल्या बातमीवरून त्याचे मार्गदर्शनाखाली पोनि/नरेश पवार, सपोनि सुनिल तारमळे, पोउपनिरी/तावडे व पोलीस पथकातील अंमलदार यांनी दिनांक ०८/१०/२०२४ रोजी १६:०० वा एवलोन वेलनेस फॅमिली स्पा सेंटर, हाई स्ट्रिट मॉल, कापुरबावडी जंक्शन, ठाणे येथे बनावट ग्राहक पाठवून सदर ठिकाणी पंच व पोलीस पथकाने छापा कारवाई केली.

सदर छाप्यात मॅनेजर नामे
१) राहुल किसन गायकवाड, वय १९ वर्षे रा. बरूवा हाऊस समोर, पातलीपाडा, ठाणे पश्चिम मुळ राहणार मु.पो. पारडी, ता. उमरखेड, जि. यवतमाळ

२) प्रिया उर्फ रूप भगवानदास दुडेजा, वय २६ वर्षे, रा. रूम नंबर ७/७०२, ग्रिन गॅलेक्सी अपार्टमेट, कल्याण रेल्वे स्टेशन समोर, कल्याण पश्चिम
यांना ताब्यात घेवुन ७ पीडीत महिंलाची सुटका केली.

सदर मसाज पार्लरच्या मधुन वेश्याव्यवसायातून मिळविलेली एकूण ७८५०/- रूपये रोख रक्कम, २ मोबाईल, एटीएम/केडीट कार्ड स्वाईप मशिन, व इतर साहीत्य कारवाई दरम्यान जप्त करण्यात आला आहे.

वरील ताब्यात घेण्यात आलेल्या वरील दोन मॅनेजर / चालक व पाहीजे
आरोपी मालक
१) सुंधाशु कुमार सिंग
२) कविता पवार यांचे विरोधात कापुरवावडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि.क. १८२७/२०२४ भारतीय न्याय संहिता १४३ (१), १४३(२), १४३(३) सह अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ३, ४ व ५ प्रमाणे दिनांक ०९/१०/२०२४ रोजी दाखल करून कारवाई करण्यात आली आहे.
सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि /सुनिल तारमळे हे करीत आहेत.

सदरची कारवाई मा. आशुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त, ठाणे शहर, मा. डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस सह आयुक्त, ठाणे शहर. मा. डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, (गुन्हे), ठाणे शहर मा. शिवराज पाटील, पोलीस उप आयुक्त, (गुन्हे), ठाणे, मा. राजकुमार डोंगरे, सहायक पोलीस आयुक्त, शोध-२, गुन्हे शाखा, ठाणे, मा. शेखर बागडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, शोध १. गुन्हे शाखा, ठाणे तथा प्रभारी अधिकारी खंडणी विरोधी पथक यांचे मार्गदर्शनाखाली पोनि/नरेश पवार, सपोनि/सुनिल तारमळे, सपोनि/कापडणिस, पोउनि/विजयकुमार राठोड, पोउनि/सुभाष तावडे, सपोउनि/बाबर, सपोउनि ढोकणे, सपोउनि/भोसले, मपोहवा/४४६६ पावसकर, पोहवा /१८ कानडे, पोहवा/५२३८ शिंपी, पोहवा ९५२ गुरसाळी, मपोहवा/५८४४ परांजपे, पोशि/१९८४ शेजवळ, मपोशि/८१०१ भोसले, चापोना/७३१२ हिवरे, मपोशि/७६६ करे यानी केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट