खंडणी विरोधी पथक २ ने उत्तमनगर पो.स्टे. चे खुनातील पाहीजे आरोपी सतिश खडके यास ४८ तासात केली अटक

सह संपादक- रणजित मस्के
पुणे
इसम नामे नारायण पांडुरंग मानसकर वय ७४ वर्षे, रा. बिबवेवाडी पुणे यांची शेती मु.पो. सांगरुन ता. हवेली जि. पुणे येथे असुन तेथे त्यांना दि. ११/०४/२०२५ रोजी सतिश विठ्ठल खडके रा. सांगरुन ता. हवेली जि. पुणे हा घेवुन गेला होता व दि. १२/०४/२०२५ रोजी नारायण मानकर त्यांच्याच गाडी मध्ये मृतदेह मिळुन आल्याने उत्तमनगर पोलीस स्टेशन गु.र.नं.५०/२०२५ भा.न्या.सं. कलम १०३ (१).३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
नारायण पांडुरंग मानकर यांचा खुन करुन त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने घेवुन सतिश विठ्ठल खडके हा फरार झाला होता. तपासा दरम्यान सतिश खडके याने त्याची मैत्रीण कल्पना वानखेडे हिच्या मदतीने सोन्याचे दागिने विक्री केल्याची माहीती मिळाली. गोपनिय माहीतीच्या आधारे सतिश विठ्ठल खडके वय ३६ वर्षे, रा. सांगरुन ता. हवेली जि. पुणे व त्याची मैत्रीण कल्पना वानखेडे हे आंबुडा ता. खामगाव जि. बुलढाणा येथे असल्याची माहीती प्राप्त होताच पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक २ गुन्हे शाखा याचे पथक रवाना केले त्यांनी स्थानिक पोलीसांची मदत घेवुन सतिश विठ्ठल खडके व कल्पना वानखेडे यांना दि.१४/०४/२०२५ रोजी ताब्यात घेवुन पुढील तपास कामी उत्तमनगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त, पुणे श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. निखील पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे २ श्री. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक २ चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय कुंभार, पोलीस उप निरीक्षक गौरव देव, पोलीस अंमलदार सुरेंद्र जगदाळे, अनिल कुसाळकर, अमोल घावटे, संग्राम शिनगारे, आजिनाथ येडे, अमोल राऊत, दिलीप गोरे, प्रशांत शिंदे, पवन भोसले, महिला पोलीस अंमलदार रुपाली कर्णवर, व आशा कोळेकर यांनी केलेली आहे.