इंदिरानगर पो. स्टे. च्या गुन्हयातील पाहीजे आरोपीस खंडणी विरोधी पथकाने घेतले ताब्यात

उपसंपादक – रणजित मस्के
नाशिक:-मा. पोलीस आयुक्त श्री. अंकुश शिंदे सो, नाशिक शहर यांनी पाहीजे आरोपीतांना लागलीच अटक करणेबाबत मार्गदर्शनपर सुचना दिलेल्या होत्या.
इंदिरानगर पोलीस स्टेशन कडील | गु.र.नं. १५३ / २०२३ भादविक ४०६ या गुन्हयातील पाहीजे आरोपी देविदास मुरलीधर आहेर याने फिर्यादी यांची महिंद्रा कंपनीची बोलेरो पिकअप गाडी नं. एम. एच. १७/ बी. वाय. ६८९३ ही विश्वासाने दरमहा २५०००/- रू. भाडयाने घेतली होती. सदरचे भाडे व गाडी परत न देता तो पसार झालेला होता. त्याबाबत इंदिरानगर पोलीस ठाणे येथे वरिल प्रमाणे गुन्हा नोंद आहे. त्या अनुषंगाने खंडणी विरोधी पथकातील पो. अंमलदार २३८९ भगवान जाधव यांना गुप्त बातमीदार यांचे मार्फतीने सदर गुन्हयातील पाहिजे आरोपी हा हॉटेल वैदेही, टिळकवाडी, नाशिक येथे येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती.
त्याप्रमाणे खंडणी विरोधी पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सापळा लावुन नमुद गुन्हयातील पाहिजे आरोपी देविदास मुरलीधर आहेर, वय ३२ वर्षे, रा. डी. २१, भुजबळ फार्म, सिडको, नाशिक यास हॉटेल वैदेही, टिळकवाडी, नाशिक येथुन शिताफीने ताब्यात घेवुन त्यास पुढील तपास व कारवाई कामी इंदिरानगर पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे. सदर आरोपीतवर यापुर्वी १) सरकारवाडा पो. स्टे. 1 गु.र.नं. ६०/२०१३, भा.द. वि. कलम ३९२, ३४ २) अंबड पो. स्टे. गु.र.नं. ६०/२०१६, भा.द.वि. कलम ३२४, ३२३, ३४ प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगीरी मा.श्री. अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त सो. नाशिक, मा. श्री. प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त सो. गुन्हे, मा. श्री. वसंत मोरे, सहा. पोलीस आयुक्त साो. गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि. प्रविण सुर्यवंशी, पोउनि दिलीप भोई, सपोउनि. दिलीप सगळे, पोहवा. राजेश भदाणे, पो.ना. योगेश चव्हाण, पो. अं. स्वप्नील जुंद्रे, भुषण सोनवणे, मंगेश जगझाप, चारूदत्त निकम, भगवान जाधव, विठ्ठल चव्हाण व म.पो.अं. सविता कदम यांनी केलेली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com