छत्रपती संभाजीनगर येथे पोलीस अधीक्षक श्री. मनिष कलवानिया यांच्या संकल्पनेतून अंमली पदार्थ विरोधी अभियान संपन्न..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

छत्रपती संभाजीनगर :– “नशा” हे “ नाश ” चे दुसरे नाव , तुमचा पाल्य व्यसनांच्या विळख्यात अडकतोय का …. पालकांनी मुलांकडे वेळीच लक्ष देणे महत्वाचे … पोलीस अधीक्षक..* मा. मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांचे संकल्पनेतुन *जिल्हयातील “अंमली पदार्थ विरोधी अभियान ” राबविण्यात आले आहे.

जिल्हास्तरावर युथ हॉलीबॉल स्पर्धा – 2024 चे आयोजन हे दिनांक 12/03/2024 रोजी सायं 19:30 वाजेला मा. पोलीस अधीक्षक यांचे प्रमुख उपस्थितीत , पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय, येथे करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण 06 उपविभागाच्या संघातील खेळाडुनी यात सहभाग नोंदवला.

एक जुटीने हे युध्द जिंकुया, ड्रग्स मुक्त भारत हिच एक जिद्द असे आवाहन मा. पोलीस अधीक्षक यांनी नागरिकांना केले आहे. …

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट