आंतरजिल्हा दरोडेखोरांच्या टोळीच्या सदस्यासह म्होरक्यास स्था. गुन्हे शाखा पुणे ग्रामीण व शिरुर पोलीसानी केले जेरबंद..

0
Spread the love

सह संपादक -रणजित मस्के

पुणे

दरोडयाच्या दोन गुन्हयांसह जबरी चोरी, घरफोडी, चोरीचे एकूण ६ गुन्हे उघडकीस आणले स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण व शिरूर पो स्टे ची धडक कारवाई

शिरूर पो.स्टे गु.र.नं. ४८७/२०२५ भा.न्या. सं २०२३ कलम ३१०,३११ प्रमाणे दि.०६/०७/२०२५ रोजी गुन्हा दाखल असून सदर गुन्हयातील फिर्यादी नामे कल्पना प्रताप निंगबाळकर वय ६० वर्षे, रा. आंबळे, ता. शिरूर जि. पुणे या त्यांचे नातेवाइक रत्नाबाई शितोळे यांचे सह राहते घरी झोपलेल्या होत्या. फिर्यादीचे पती वारीला गेलेले होते. फिर्यादीचा मुलगा संदिप हा त्याची पत्नी व मुलांसह फिर्यादी इ गोपलेल्या खोलीचे बाजूचे खोलीत झोपला होता. दि. ०५/०७/२०२५ रोजी रात्रौ ०१/०० वा पाच ते सहा अनोळखी चोरटयांनी फिर्यादीचे घराचा दरवाजा लाथा मारून तोडला व चोरट्यांनी घरात प्रवेश करून फिर्यादी व त्यांचे नातेवाईक रत्नाबाई शितोळे यांना दांडक्याने माराहण केली आणि मंगळसूत्र, कर्णफुले, चांदीची जोडवी असे एकूण २ तोळे वजनाचे सोन्याचे-चांदीचे दागिने एकूण १,६४,०००/-किंचा मुद्देमाल दरोडा टाकून चोरून नेला होता. झालेल्या घटनेच्या अनुषंगाने वरील प्रमाणे फिर्याद नोंदविली आहे.

सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा होता, मा. पोलीस अधीक्षक साो पुणे ग्रामीण यांनी सदर गुन्हा उघडकीस आणण्याचे अनुषंगाने योग्य ते मार्गदर्शन करून सुचना केल्या होत्या. सदर गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून सुरू करणेत आला. घटनास्थळाची पाहणी करून सदरची घटना रात्रीचे वेळी घडलेली होती. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करता, चोरटयांनी गुन्हा करणेसाठी सिल्हवर रंगाचे चारचाकी तवेरा वाहनाचा वापर केल्याचे निष्पन्न झाले, त्या अनुषंगाने सुमारे १५० किमी पर्यंत सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, संशयित वाहन पाथडों परिसरातून पुढे गेल्याचे आढळले. दरम्यान गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, गुन्हयातील संशयित तवेरा गाडी हो रेकॉर्डवरील गुन्हेगार संजय तुकाराम गायकवाड रा. भोकरदन जालना हा वापरत असून त्यानेच सदरचा गुन्हा त्याचे साथीदाराचे मदतीने केला असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीचे आधारे संजय गायकवाड याचा शोध घेत असताना, संजय गायकवाड हा त्याचे ताब्यातील तवेरा गाडी घेवून त्याचे साथीदारासह नगर-पुणे रोडने पुणे बाजकडे जात आहे अशी माहिती मिळाल्याने, माहितीचे आधारे दि ०६/०७/२०२५ रोजी आरोपी १) संजय तुकाराम गायकवाड वय ४५ वर्षे, रा. धनगरवाडी, भोकरदन, जि. जालना २) सागर सुरेश शिंदे वय १९ वर्षे, रा. संत तुकाराम नगर मंठा ता मंठा जि जालना यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांचे कडे चौकशी केली असता, त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याचे निष्पन्न झाले असून सदरचा गुन्हा करताना त्यांचे सोबत इतर पाच साथीदाराचे मदतीने केला असल्याचे सांगितले, आरोपींना विश्वासात घेतले असता, आरोपींनी खालीलप्रमाणे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले.

अ.क्र. पोलीस स्टेशन

गुर.नं.

उघडकीस आलेले गुन्हे

शिरूर, पुणे प्रा.

शेवगाव, अहिल्यानगर

४७८/२०२५ IINS ३१०,३११

५१६/२०२५ BNS ३१०(२)

५३३/२०२५ BNS ३०९/५०, ३३३(४) ६

अ.क्र. पोलीस स्टेशन

अकोला जुनेशहर, अकोला

अकोला जुनेशहर, अकोला

मालेगाव, वाशिन

४३१/२०२५ BNS ३३१ (४), ३०५(अ)

४४६/२०२५ BNS ३०५

३०२/२०२५ BNS ३३२(४) ३०५(अ)

पारनेर, अहिल्यानगर

पुणे ग्रामीण पोलीसांनी ताब्यात घेतलेली गुन्हेगारी टोळी ही सराईत दरोडेखोरांची टोळी आहे. वेगवेगळया जिल्हयातील पोलीसांची पथके या टोळीचे मागावर होती. या टोळीवर विविध जिल्हयांमध्ये दरोडा, जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत, ही सराईत टोळी गुन्हा करतेवेळी महिलांना लक्ष्य करून प्रथम त्यांना दांडक्याने मारहाण करून त्यांचे अंगावरील दागिने जबरदस्तीने हिसकावून घेतात. या टोळीवर बीड जिल्हयात मोक्का कायद्यांतर्गत कारवाई झालेली आहे.

आरोपी संजय तुकाराम गायकवाड हा सराईत गुन्हेगार असून त्याचेवर बापुर्वी जालना, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, बीड, जळगाव, परभणी, लातूर वा जिल्हयात एकूण १३ गुन्हे दाखल त्यामध्ये दरोडा, जबरी चोरी, घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल असून तो गुन्हेगारी टोळीचा प्रमुख असल्याने त्याचेवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करणेत आलेली असून तो पाच वर्षे कारागृहात होता, मागील सहा महिन्यापुर्वी तो जामीनावर बाहेर आलेला आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल्ल सो. पुणे ग्रामीण, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. रमेश चोपडे, पुणे विभाग, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले शिरूर विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिरुर पो स्टे चे पो नि संदेश केंजळे, स्था.गु.शा.चे सपोनि कुलदीप संकपाळ, पोलीस अंमलदार, तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, राजू मोमीण, अतुल डेरे, सागर धुमाळ, शिरूर पो स्टे चे अंमलदार नितेश थोरात, निखील रावडे, निरज पिसाळ, रविंद्र आव्हाड, अजय पाटील यांनी केली असून पुढील तपास शिरूर पो स्टे व स्थागुशा चे पथक करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट