आणखी एक सराईत गुंड ३ महिण्याकरीता गोंदिया ग्रामीण पोलीसांनी केली कारवाई…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया :-सराईत गुन्हेगारास 3 महिण्याकरिता गोंदिया, भंडारा, बालाघाट, जिल्ह्यातून केले हद्दपार

याबाबत थोडक्यात माहिती अशी की, गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यास विविध गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराला जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी गोंदिया ग्रामीण पोलीसांनी केलेल्या कारवाईला यश आले असून.. उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी आदेश काढून सराईत गुन्हेगार नामे – किसन रमेश दमाहे वय 40 वर्षे रा. इर्री यास गोंदिया जिल्ह्यातून तीन महिन्यांच्या कालावधीकरिता हद्दपार केले आहे.

गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत ग्राम इर्री येथील रहिवासी सराईत गुन्हेगार किसन दमाहे याच्याविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात खूनाचा प्रयत्न, अवैध जुगार , दारू विक्री, भांडण, मारहाण, दंगा करणे, जबरीने इच्छापूर्वक गंभीर दुखापत करणे, धमकी देणे, अशाप्रकारचे विवीध कलमाखाली 9 गंभीर गुन्हे दाखल आहेत.

गोंदिया ग्रामीण पोलिसांनी त्याचेवर वारंवार प्रतिबंधात्मक कारवाई करुन सुध्दा त्याचे वर्तणुकीत… चारित्र्यात आणि सवयीत कसलीही सुधारणा झाली नाही… उलट तो मगरूर व धाडसी प्रवृत्तीचा असल्याने परिसरातील लोकांच्या मनात दहशत निर्माण होऊन त्याच्या कृतीमुळे परिसरातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था धोक्यात आली होती.. आणि त्यामुळे गोंदिया ग्रामीण पोलिस निरीक्षकांनी त्याला जिल्हा गोंदिया, भंडारा, व नजीकच्या बालाघाट जिल्हा हद्दीतून हद्दपार करण्याकरिता महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 56 (ब) अन्वये प्रस्ताव तयार करून उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी पर्वणी पाटील यांच्याकडे प्रस्ताव मंजुरीस्तव सादर केलेला होता.

उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, गोंदिया श्रीमती पर्वणी पाटील, यांच्या आदेशानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती रोहिणी बानकर, यांनी विहित मुदतीत प्रस्तावाची प्राथमिक चौकशी पूर्ण करून सराईत गुंड ईसंम नामे -किसन रमेश दमाहे वय 40 वर्षे रा. इरी याला गोंदिया जिल्हयाच्या हद्दीतून हद्दपार करण्याची शिफारस केली होती. अखेर उपविभागीय दंडाधिकारी, गोंदिया, यांनी 30 जुन रोजी हद्दपारीचे आदेश काढून सराईत गुंड -किसन दमाहे याला 3 महिन्यांच्या कालावधीकरिता जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.

गोंदिया ग्रामीण पोलीसांचे हद्दपारीचे कारवाई मुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळवून दिला आहे.. पोलिसांकडून होत असलेल्या हद्दपारीच्या कारवायांमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून, गुन्हेगारांनी आपल्या अवैध कृत्य व अवैध धंद्यांपासून परावृत्त होऊन इतर वैध रोजगाराकडे वळावे असे जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांना आवाहन करण्यात येत आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री. निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक, श्री. नित्यानंद झा, उपविभागीय पोलीस अधिकारी गोंदिया, श्रीमती रोहिणी बानकर, मॅडम यांच्या निर्देशांन्वये व मार्गदर्शनात गोंदिया ग्रामीण पोलीस निरीक्षक श्री. चंद्रकांत काळे, स्थागुशा चे पो.नि. श्री. दिनेश लबडे यांचे मार्गदर्शनात अधिकारी, अंमलदार यांनी कारवाई केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट