अनोळखी महीलेच्या खुनाचा गुन्हा स्थानीक गुन्हे शाखा व पारोळा पोलीस स्टेशन च्या पथकाने उघडकीस आणला…

सह संपादक -रणजित मस्के
जळगाव :- सुमठाणे ता. पारोळा गावाजवळ वनक्षेत्राच्या राखीव कुरण जंगलाच्या मध्यभागी एका ४५ ते ५० वयोगटाचा स्त्री जातीचा चेहरा छिन्नबिछीन्न अवस्थेत असा अनोळखी मृतदेह आढळुन आला होता, त्यावरुन पारोळा पोलीस स्टेशन CCTNS भाग-५ गुरनं-१५४/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३(१), २३८ प्रमाणे दि.२६/०६/२०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.


सदर दाखल गुन्हयांच्या अनुषंगाने मा.डॉ. महेश्वर रेडडी सो. पोलीस अधिक्षक जळगांव यांनी घटनास्थळी त्यांच्या सोबत मा. श्रीमती कविता पवार, अपर पोलीस अधीक्षक चाळीसगांव, मा. श्री. विनायक बाजीराव कोते मा. उप विभागीय पोलीस अधिकारी, अमळनेर भाग, अमळनेर अशांनी गुन्हयाच्या घटनास्थळी भेटी दिली व सदर गुन्हयाच्या पुढील अधिक तपासाच्या अनुषंगाने सुचना व मार्गदर्शन केले. सदर गुन्हयात अनोळखी महिलाचा व अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक मा. डॉ. महेश्वर रेडडी यांनी शोध पथक तयार करण्याचे आदेशीत केल्यावरुन पारोळा पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक सचिन सानप, स्था.गु.शा.चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांची तपास पथके तयार करण्यात आले.
त्यावरुन स्थानीक गुन्हे शाखा जळगाव तसेच पारोळा पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने सर्वप्रथम नमुद महीलेची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. आसपासच्या जळगाव जिल्हयातील तालुक्यात तसेच धुळे जिल्हयात कुठे मोठ्या व्यक्ती हरविलेबाबत नोंद आहे का? याचा शोध सुरु झाला. परंतु कोणत्याही पोलीस ठाण्यात सदर वयोगटाची महीला हरविलेबाबत नोंद नसल्याने पोलीसांसमोर एक आव्हान ठाकले होते. अशातच उंदीरखेडे ता. पारोळा येथील शोभाबाई रघुनाथ कोळी वय ४८ वर्ष ह्या हरविले असल्याची कुणकुण पारोळा पोलीसांना लागली त्यावरुन नमुद महीलेचा फोटो व सुमठाणे कुरण जंगलाच्या मध्यभागी ४५ ते ५० वयोगटाचा स्त्री जातीचा सापडलेला मृतदेह याचे साम्य आढळल्याने नमुदचा मृतदेह हा शोभाबाई रघुनाथ कोळी वय ४८ वर्ष रा.उंदीरखेडे ता. पारोळा यांचाच असल्याचे निष्पन्न झाले त्यावरुन सदरची महिला शोभाबाई रघुनाथ कोळी वय-४८ वर्षे, रा. उंदीरखेडा, ता. पारोळा, जि. जळगांव ह्यांचे असून तिचे शव अंत्य विधीसाठी तिचे नातेवाईक यांच्या ताब्यात दिले. व तपासाला दिशा व गती मिळाली.
त्यानंतर मा.डॉ.श्री महेश्वर रेड्डी सो. पोलीस अधीक्षक जळगांव यांनी तांत्रिक मदतीकरीता करीता स्थानीक गुन्हे शाखा जळगांव यांच्या मदतीने महिला वापरत असलेली मोबाईलचे सी.डी.आर. तपासण्याचे आदेशीत केल्यावरुन, सदर महीलेच्या सी.डी. आर. विश्लेषणावरुन सुमठाणे गावातील संशयीत इसम अनिल गोविंदा संदांशिव हा मयत शोभाबाई कोळी सोबत होता. असे निष्पन्न होत होते. त्यावरुन सदर संशयीत इसम अनिल गोविंदा संदांशिव यास पारोळा पो.स्टेची टीम व स्था.गु.शा. जळगांव यांची टीम यांनी सुमठाणे गावात जाऊन शोध घेतला असता, तो गावातून फरार होता. सदर पारोळा पो.स्टेची टीम व स्था.गु.शा. जळगांव टीम अशांनी जापी- शिताणे ता.जि. धुळे गावाच्या रस्त्यावर मोटारसायकलवर जात असतांना दि. २८/०६/२०२५ रोजी मध्यरात्री ताब्यात घेतले. त्यास गुन्हयात विचारपुस केली असता त्यांने सोन्याचे दागिने व रोख रक्कमेस बळी पडून सदर महिलेचा खुन केल्याची कबुली दिली आहे.
सदर मयत महिला ही पारोळा शहरात विविध ठिकाणी धुणी-भांडी करून शरीरावर सोन्याचे दागिने परिधान करत होती. सदर महिलेचा सुमटाणे गावातील इसम अनिल गोविंदा संदांशिव वय-४५ वर्ष याने गैर फायदा घेत सोन्याचे दागिने या गोष्टीला बळी पडून त्याने सदर महिलेशी ओळखी साधली होती. सदर महिलेला त्याने विश्वासात घेवून तिला सुमठाणे गावा जवळ असलेले वनक्षेत्राचे राखीव कुराण/जंगलाच्या मध्यभागी नेऊन आरोपी अनिल गोंविदा संदांशिव याने सोन्याचे दागिने व रोख रक्कमेस बळी पडून सदर महिलेचा खुन केल्याची कबुली दिली आहे.
सदरची कारवाई मा.डॉ. महेश्वर रेडडी सो. पोलीस अधिक्षक जळगांव, मा. श्रीमती कविता नेरकर, अपर पोलीस अधीक्षक चाळीसगांव, मा. श्री. विनायक बाजीराव कोते मा. उप विभागीय पोलीस अधिकारी, अमळनेर भाग, अमळनेर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संदीप पाटील, बरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानीक गुन्हे शाखा जळगाव, श्री सचिन सानप पोलीस निरीक्षक सपोनि / चंद्रसेन पालकर, सपोनि योगेश महाजन पारोळा पोलीस स्टेशन पोउपनि जितेंद्र वल्टे, पोउपनि। शेखर ढोमांळे, पोह/ संदीप पाटील, पोह/ प्रविण मांडोळे, पोह। हरलाल पाटील, चापोह/ भरत पाटील, पोकों/राहूल पाटील सर्व नेम, स्थानीक गुन्हे शाखा जळगाव तसेच पोह/४१८ सुनिल हाटकर, पोह/१०२७ महेश पाटील, पोह/४२२ डॉ. शरद पाटील, पोना/३०७४ संदीप सातपुते, पोकॉ/१६१२ अभिजीत पाटील पोकों/४४५ चतरसिंग मेहर मपोकों/ काजल जाधव पोकॉ/८५० आशिष गायकवाड, पोकों/२२५८ अनिल राठोड, पोकॉ/४५९ मिथून पाटील, पोकों/२८२ विजय पाटील, मपोकों/२०४५ सविता पाटील वाहन चालक पोह/३३१८
मधुकर पाटील व चालक होम/ भैय्यासाहेब पाटील पारोळा पोलीस स्टेशन यांच्या पथकाने संयुक्तरित्या केली आहे. सदरचा गुन्हयाचा तपास श्री सचिन सानप, पोलीस निरीक्षक पारोळा पोलीस स्टेशन हे करत आहे.