अंमली पदार्थाची वाहतूक करणाऱ्या २ आरोपींना वाडा पोलीसांकडून अटक..!

0
Spread the love

अंमली पदार्थाची वाहतूक करणाऱ्या २ आरोपींना वाडा पोलीसांकडून अटक..!

उपसंपादक : मंगेश उईके

पालघर.
दिनांक ११/०३/२०२५ रोजी वाडा पोलीस ठाण्याचे पोलीसांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, खोडाळा-वाडा रोडवर एका कार मधुन अंमली पदार्थांची अवैधरित्या वाहतुक होणार आहे. सदरची माहिती मिळताच वाडा पोलीसांनी दोन पथके तयार करुन वाडा-खोडाळा रोडवर हारोसाळे गावच्या हद्दीतील तलावाजवळ सापळा रचून बसले. सायंकाळी ५:४५ वाजेच्या सुमारास खोडाळा बाजुकडुन एक मारुती सुझुकी कंपनीची आल्टो मॉडेलची मोटार कार क्रमांक M.H.15-BD-7280 हिला हारोसाळे तलावा जवळ पोलीसांनी हात दाखवुन थांबविण्यास सांगीतले. मोटार कार चालकाने रोडच्या किनारी कार थांबवली. त्यावेळी सदर मोटार कारमध्ये दोन इसम बसलेले होते. त्यांना त्यांची नावे विचारली असता १) फारुक नजीर शेख, वय ५३ वर्ष, रा.अस्वली स्टेशन, ता. इगतपुरी, जि. नाशिक, २) अविनाश दिलीप राजभोज, वय २७ वर्ष, रा. अस्वली स्टेशन, ता. इगतपुरी, जि.नाशिक असे सांगितले. सदर मोटार कारची झडती घेतली असता कारच्या ड्रायव्हरच्या सिटच्या मागील बाजुस एक काळया-पिवळसर रंगाची पिशवीमध्ये एक पिवळसर रंगाची पिशवी, एक पांढऱ्या रंगाची पिवशी व खाकी रंगाच्या प्लास्टीकच्या चिकटपट्टीने पॅक केलेले २ बॉक्स मिळुन आले. कारमध्ये मिळुन आलेल्या मालाबाबत नमूद इसमांकडे चौकशी केली असता त्या पिशवीमध्ये गांजा असल्याचे सांगीतले. सदरच्या पिशव्या व चिकटपट्टीने चिकटवलेले बॉक्स उघडून पाहीले असता त्यामध्ये गांजा हा अंमली पदार्थ असल्याची खात्री झाली. नमूद इसमांना ताब्यात घेऊन त्यांचेकडून ५ किलो ७५ ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ, मोटार कार व मोबाईल असा एकूण ३,३५,०७५/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदर आरोपींविरुध्द वाडा पोलीस ठाणे येथे गु.रजि.नं. १ १०६/२०२५ गुंगीकारक औषधीद्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनीयम १९८५ चे कलम ८ (क), २० (ब) (ii) (अ), २८ प्रमाणे गुन्हा दाखल असुन अधिक तपास पोउपनि /सुमेध मेढे, नेमणुक वाडा पोलीस ठाणे हे करत आहेत.

सदरची कारवाई ही श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर श्री. विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. गणपत पिंगळे, उप विभागीय पोलीस अधिकारी जव्हार विभाग यांचे मार्गदर्शनाखाली श्री. दत्तात्रय किंद्रे, पोलीस निरीक्षक, वाडा पोलीस ठाणे, पोउपनिरी/सागर मालकर, पोउपनिरी/सुमेध मेढे, पो.हवा./गुरुनाथ गोतारणे, पोअं/गजानन जाधव, पोअं/चेतन सोनावणे, पोअं/संतोष वाकचौरे यांनी पार पाडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट