अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या आरोपीवर पालघर पोलीस ठाणे यांचेकडून कारवाई…!

उपसंपादक : मंगेश उईके
पालघर.
श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर यांनी पालघर जिल्हयात एन. डी. पी. एस. कायदया अंतर्गत मोहीम राबवून जिल्हयातील अंमली पदार्थाची वाहतुक तनेच विक्री करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणे बाबत सुचना दिलेल्या आहेत.
दिनांक ०५.०३.२०२५ रोजी पालघर शहरात गांधीनगर येथे एक महिला गांजा या अंमली पदार्थाची विक्री करत असल्याची गुप्त बातमीदाराद्वारे पालघर पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री. अनंत पराड यांना माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीची पोलीस निरीक्षक श्री. अनंत पराड व पोउप निरीक्षक संकेत पगडे यांनी बातमीची शहानिशा करून मा. उप विभागीय पोलीस अधिकारी, पालघर यांची परवानगी घेवून गांधीनगर पालघर पुर्व येथे छापा टाकला असता महिला आरोपी नामे रेहाना हाजी मस्तान शेख रा. गांधीनगर पालघर पुर्व ता. जि. पालघर हिचे राहते घरी ३ किलो १४० ग्रॅम वजनाचा एकुण ३२,००० रूपये किंमतीचा गांजा हा अंमली पदार्थ बाळगुन विक्री करीत असतांना मिळून आली. सदरबाबत पालघर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि.नं. ७०/२०२५ एन डी पी एस १९८८ कलम ८ (क) २० (ब), Ⅱ (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संकेत पगडे नेमणुक पालघर पोलीस ठाणे हे करीत आहेत.
सदरची कारवाई मा. श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, मा.श्री. विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक, पालघर, मा. श्री. अभिजीत धाराशिवकर, उप विभागीय पोलीस अधिकारी, पालघर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. अनंत पराड, प्रभारी अधिकारी, पालघर पोलीस ठाणे, पोउप निरीक्षक संकेत पगडे, पो उप निरीक्षक दौलत आतकारी, सहा पो उप निरीक्षक सुभाष खंडागळे, पो हवा भगवान आव्हाड, पोहवा चंद्रकांत सुरूम, पोना/परमेश्वर मुसळे, पोअ म्हाळू शिंदे, पोअ सागर राऊत, पोअं आकाश आराख, पोअं नितीन डोके, पोअं/भगवान केंद्रे, मपोअं निर्मला वरपे, मपोअं पुनम खडके यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.