खरवली येथून बेपत्ता झालेली अनीता कदम महिला सापडली…

0
IMG-20250122-WA0004
Spread the love

उपसंपादक -राकेश देशमुख

महाड

महाड तालुक्यातील बिरवाडी खरवली येथून एक 47 वर्षीय विवाहित महिला बेपत्ता झाल्याची तक्रार महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. अनिता दिनकर कदम राहणार खरवली तालुका महाड असे बेपत्ता झालेल्या महिलेचे नाव असून पती दिनकर गोविंद कदम यांनी पोलीस ठाण्यात आपली पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. सदरची मिसिंग महिलाही मानसिक रुग्ण असल्यामुळे तिला विसरण्याची सवय होती यामुळेच ती खरवली येथून मुंबईला निघून गेली. पोलिसांनीही सहा दिवस या मिसिंग महिलेचा तपास चालूच ठेवला यानंतर पोलिसांना माहिती मिळाली की सदरची महिला मुंबई येथे आहे. महिलेचे पती व मुलगी यांनी मिसिंग महिलेला मुंबई येथून महाड एमआयडीसी पोलीस ठाणे येथे हजर केले पोलिसांनीही पती व मुलगी यांचे सविस्तर जबाब घेऊन मिसिंग महिलेला त्यांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे. महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक इकबाल शेख यांनी या तपासाची चक्र फिरवीत या मिसिंग महिलेचा शोध घेतला. या संपूर्ण प्रकरणामुळे परिसरातील नागरिक त्यांच्या कामगिरीवर कमालीचे खुश असून संपूर्ण तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट