अंमली पदार्थ विरोधी पथक कल्याण परिमंडल ३ॲक्शन मोडवर

0
Spread the love

प्रतिनिधी विश्वनाथ शेनोय

कल्याण ठाणे


दि.१२रोजी कल्याण व डोंबिवली शहर परिसरात बेकायदेशीर अंमली पदार्थ विकी करणारे पेडलर यांचेवर कारवाई करण्या करीता पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३ कल्याण यांचे विशेष कारवाई पथकाने व पोलीस ठाणे यांनी परिमंडळात खालील प्रमाणे अंमली पदार्थ विरोधी कारवाई करण्यात आलेली माहिती (१) कोळसेवाडी पोलीस ठाणे हददीत सोनवाणे टॉवर समोर रस्त्या लगतच्या मोकळया मैदानाजवळ कल्याण पुर्व परिसरात १) आरोपी नाव प्रथम तुकाराम गायकवाड, वय. २३ वर्षे रा.प्रथम निवास, जरिमरी मंदीर रोड, मनोज निवासचे बाजुला, तिसगांव कल्याण पु. याचे ताब्यातुन १.०५७ कि.ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आला असुन आरोपीस अटक करण्यात आली. त्याचे विरूध्द कोळसेवाडी पोलीस ठाणे गु.र.नं.३६९/२५, अंमली पदार्थ विरोधी कायदा १९८५ चे कलम ८ (क), २० (ब) (पप) (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले.(२) बाजारपेठ पोलीस ठाणे हददीतुन अमृतपर्ल बिल्डींगचे बाजुला, कोळीवाडा ते बकरामंडी कडे जाणारा रस्ता, कोळीवाडा कल्याण परिसरात १) आरोपी नाव गोपाळ गणपत भिडे, वय – ४५ वर्षे रा. कल्याण कोळीवाडा, रूम नं.१ गोविंदवाडी रोड, कल्याण प जिल्हा ठाणे याचे ताब्यातुन ३७० ग्रॅम गांजा अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आला असुन आरोपीस अटक करण्यात आली. त्याचे विरूध्द बाजारपेठ पोलीस स्टेशन गु.र.नं.३०५/२५, अंमली पदार्थ विरोधी कायदा १९८५ चे कलम ८ (क), २० (ब) (II) (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले.(३) खडकपाडा पोलीस ठाणे हददीतुन बनेली रोड आंबिवली रेल्वे फाटक जवळ १) महिला नामे शहनाज तेजीब हुसेन इराणी, वय ६५ वर्षे रा. इंदीरानगर, वाल्मिकी शाळे समोर, इराणी वस्ती, आंबिवली रेल्वे स्टेशन जवळ, ता. कल्याण जिल्हा ठाणे हिचे ताब्यातुन ४५५ ग्रॅम गांजा अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आला असुन आरोपीस अटक करण्यात आली. तिचे विरूध्द खडकपाडा पोलीस स्टेशन गु.र.नं.३६५/२०२५, अंमली पदार्थ विरोधी कायदा १९८५ चे कलम ८ (क), २० (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले.असे वरील प्रमाणे एकुण ०३ गुन्हे दाखल केले असुन नमुद गुन्हयांत एकुण १.८२५. ५७ कि.ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ जप्त करण्यात येवुन आरोपींना अटक करण्यात आली आहे.सदरची कामगिरी परिमंडळ ३ कल्याण विशेष कारवाई पथक व पोलीस ठाणे यांनी संयुक्तपणे केली आहे. अशा प्रकारे परिमंडळ ३ कल्याण मध्ये अंमली पदार्थ विरूध्द कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट