अंमली पदार्थ विरोधी पथक २ गुन्हे शाखा पुणे शहर यानी येरवडा भागात २,८१,०००/- रु किं. चा गांजा केला जप्त..

सह संपादक- रणजित मस्के
पुणे :
तसेच एन.डी.पी.एस गुन्हयातील पाहिजे आरोपीस केले जेरबंद
दि.१५/०१/२०२५ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहरचे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक व स्टाफ असे येरवडा पोलीस स्टेशनचे हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार संदिप शेळके यांना मिळालेले बातमीवरुन इसम नामे १) जगदिश भवानसिंग बारेला, वय १८ वर्षे, रा. मु.पो दहिवत अंमळनेर जिल्हा जळगांव महाराष्ट्र २) पवन सुभाष बारेला वय २२ वर्षे, मु.पो कलकुंटी ता वारला जिल्हा बरवानी मध्य प्रदेश यांच्या ताब्यात एकुण २,८१,०००/- रु.कि.चा १३ किलो गांजा हा अंमली पदार्थ तसेच इतर ऐवज जप्त करून त्याचे विरुध्द येरवडा पोस्टे गु.र.नं.२०८/२०२५, एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (ii) (ब), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच लष्कर पोलीस स्टेशन गुन्हा रजिः नंबर ०८/२०२५ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २२ (क), २९ मधिल पाहिजे आरोपी नदिम मेमन हा कोंढवा मंडई जवळ पुणे येथे येणार असल्याची बातमी पोलीस अंमलदार साहिल शेख यांना मिळाल्याने सदर बातमीचे अनुषंगाने कोंढवा मंडई जवळ येथे सापळा रचुन पाहिजे आरोपी नदिम मेमन ऊर्फ इब्राहिम अल्ताफ कच्ची वय २५ वर्षे रा भाग्योदय नगर, किर्ती बिल्डींग, डि विंग प्लेंट नं ३ कोंढवा पुणे यास ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही कामी अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा, पुणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरील कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त, पुणे श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्री. निखील पिंगळे मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे. २, श्री. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक २, चे पोलीस निरीक्षक श्री. सुदर्शन गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस अंमलदार संदिप शेळके, साहिल शेख, प्रशांत बोमादंड्डी, संदिप जाधव, रविंद्र रोकडे, मयुर सुर्यवंशी, नितीन जगदाळे, योगेश मांढरे, अझिम शेख, युवराज कांबळे, आझाद पाटील दिनेश बास्टेवाड यांनी केली आहे.