आंघोळ करणाऱ्या महिलेचे फोटो/व्हिडीओ काढणाऱ्या आयबी सुरक्षा रक्षकाच्या बंडगार्डन पोलीसांनी आवळल्या मुसक्या..

पुणे:पुणे स्टेशनकडील आयबीच्या शासकीय निवासस्थान गेस्ट हाऊसमध्ये आंघोळ करणाऱ्या एका महिलेचा बाथरुममधील खिडकीतून फोटो काढणाऱ्या आयबीच्या सुरक्षारक्षकाला बंडगार्डन पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
अशोक तुकाराम चव्हाण वय २६ वर्षे रा. आय बी गेस्ट हाऊस असे अटक केलेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे.
याबाबत एका २६ वर्षाच्या महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती की फिर्यादी महिला या आयबी गेस्ट हाऊसमधील आपल्या खोलीत सोमवारी दुपारी आंघोळ करीत होत्या. यावेळी सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या सुरक्षारक्षक चव्हाण हा बाथरुमच्या खिडकीजवळ आला. खिडकीचे बाहेर उभा राहून त्याने आंघोळ करणाऱ्या या फिर्यादी महिलेचे आपल्या मोबाईलवर फोटो व व्हिडिओ काढले.
हा प्रकार लक्षात संबंधीत महिलेच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला. तेव्हा तेथे असणाऱ्या लोकांनी चव्हाण याला पकडून पोलिसांच्या हवाली केले.पुढील तपास बंडगार्डन पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्री. सपकाळे साहेब करीत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
dipakbhogal@surakshapolicetimes.com