अंधेरीत दैवज्ञ समाजाची नवीन कार्यकारिणीची निवड अध्यक्ष श्री. अशोक माहुलकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न..

0
Spread the love

संपादिका- दिप्ती भोगल

अंधेरी :-अंधेरी दैवज्ञ समाजाची नविन कार्यकारणी सदस्य यांनी अध्यक्ष अशोक माहुलकर यांच्या अध्यक्षतेखाली समाजश्रेष्ठी डॉक्टर गजानन रत्नपारखी सर यांची मार्गदर्शनासाठी सदिच्छा भेट घेतली.

सरांनी उत्तमप्रकारे मार्गदर्शन केले. मी सदैव अंधेरी दैवज्ञ समाजाच्या प्रगतीसाठी व उन्नतीसाठी तुमच्या पाठीशी आहे. डिसेंबर महिन्यात दै, स, प चे अधिवेशन आहे, त्यावेळी सहकार्य करा असे आपुलकीचे आव्हान ही केले.

प्रसंगी समाजश्रेष्ठी डॉक्टर गजानन रत्नपारखी सर यांनी नवनिर्वाचीत अध्यक्ष अशोक माहुलकर यांचे शाल आणि पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले. तसेच. उतोरोत्तर प्रेमाचा गोडवा वाढत जावा यासाठी पेढा भरवून सर्वांचे तोंड गोड केले ,व शुभेच्छा दिल्या .

अध्यक्ष अशोक माहुलकर “हे म्हणाले की आज आमची जी काही ओळख आहे ती सरान मुळे त्यांनी आपल्या अमृतवाणीमुळे दानशूरतेमुळे कर्तृत्ववामुळे वकृत्वामुळे कार्याचा ठसा उमटविला आहे तो कुठेही कमी पडणार नाही याची दक्षता घेवू अंधेरी दैवज्ञ समाजाचे नाव उत्तराउत्तर वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहू”.
सदिच्छा भेटी मध्ये अध्यक्ष अशोक माहुलकर, उपाध्यक्ष डॉ विष्णू पाटणकर, उपाध्यक्ष ज्योती पोवळे, सहसेक्रेटरी सुनिल वाडकर, महिला विभाग सेक्रेटरी आरती मसुरकर, महिला विभाग खजिनदार नीता कासेकर, कार्यकारणी सदस्य समिधा धारगळकर,संपर्क प्रमुख सुधीर धारगळकर, कार्यकारणी सदस्य समिर ओटवकर, हेमंत कारेकर, मनोहर दांडेकर आणि सरचिटणीस अनिल कारेकर उपस्थित होते.

नवीन कार्यकारिणी
संरक्षक :समाजश्रेष्ठी डॉ गजानन रत्नपारखी ,
श्री क्रांतीकुमार कुष्टे
अध्यक्ष: श्री अशोक माहुलकर
उपाध्यक्ष: श्री महेश कोलथरकर, डॉ विष्णू पाटणकर, सौ.ज्योती पोवळे
सरचिटणीस: श्री.अनिल कारेकर
खजिनदार : श्री विकास मसुरकर
सह सेक्रेटरी: श्री सुनिल वाडकर
उप खजिनदार: श्री राजेंद्र कारेकर
सम्पर्क प्रमुख: श्री सुधीर धारगळकर
कार्यकारणी सदस्य: श्री कमलेश कुष्टे, सौ.आरती मसुरकर, श्री महेश पैठणकर,श्री समिर ओटवकर, श्री हेमंत कारेकर, सौ समिधा धारगळकर,श्री मनोहर दांडेकर, श्री चेतन पोतदार.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट