अवैधरित्या कल्याण डोंबिवली शहर मध्ये राहणाऱ्या ०६ बांग्लादेशी नागरिकांविरुद्ध पोलिसांची धडक कारवाई

0
Spread the love

कल्याण:

प्रतिनिधी-विश्रवनाथ शेनोय

दि २९ कल्याण ठाणे
पोलीस आयुक्त ठाणे शहर यांचे आदेशान्वये दि. २८ रोजी पोलीस उप आयुक्त परिमंडळ ३ कल्याण अंतर्गत पोलीस ठाणे अवैधरित्या वास्तव्य करत असलेले बांगलादेशी नागरिकांबाबत शोध मोहिम राबविण्यात आली होती. त्याअनुषगाने गोपनीय बातमी व्दारे कल्याण व डोबिवली शहर मधील संशयीत इसमांना पोलीस ठाणे येथे बोलावुन त्यांचेकडील आधारकार्ड, पॅनकार्ड व इतर कागदपत्रांची सखोल चौकशी करण्यात आली. संशयीत इसमांचे कागदपत्रे चौकशी दरम्यान एकुण ०६ बांगलादेशी नागरिक अवैधरित्या वास्तव्य करत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांचे विरूध्द पारपत्र (भारतात प्रवेश) अधिनियम १९२० चे कलम ३.४ विदेशी नागरिक कायदा १९४६ चे कलम १३.१४(अ) (ब) प्रमाणे कारवाई करून अनुक्रमे महात्मा फुले चौक पोलीस ठाणे-०१. खडकपाडा पोलीस ठाणे-०१, बाजारपेठ पोलीस ठाणे-०१ व टिळकनगर पोलीस ठाणे-०१ मध्ये असे एकुण ०४ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास चालु आहे.त्याचप्रमाणे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३ कल्याण हददीत माहे जानेवारी २०२५ ते आज पावेतो एकुण ३८ अवैधरित्या वास्तव्य करणारे बांगलादेशी नागरिक विरूध्द एकुण १६ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तरी यापुढेही कल्याण व डोबिवली शहरात अवैधरित्या राहणारे बांगलादेशी नागरिक विरूध्द कारवाई सुरू राहणार असल्याची पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट