अंमली पदार्थ विरोधी पथक १, गुन्हे शाखा पुणे शहर मेफेड्रोन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करणा-यास केले जेरबंद,..

0
Spread the love

सह संपादक -रणजित मस्के

पुणे

दिनांक ३०/०६/२०२५ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा, पुणे शहर कडील अधिकारी व अंलदार हे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना उंटाड्या मारुती मंदिराच्या पाठीमागे, के.एम हॉस्पीटल वॉल कंम्पाउंड भिंती जवळ, त्रिमुर्ती कॉम्पलेक्स समोर, सार्वजनिक रोडवर, रास्ता पेठ पुणे इसम नामे आकिब अशफाक शेख वय २८ वर्षे, रा.एस.आर.ए पत्र्याची चाळ, होबे हॉस्पीटल समोर, ए.डी. कॅम्प चौक, भवानी पेठ पुणे हा संशयस्पदरित्या उभा असल्याचे मिळुन आला. सदर इसमाची झडती घेतली असता त्याचे पॅन्टच्या खिशामध्ये किं. रु ३,७३,४००/- चे १८ ग्रॅम ६७ मिलीग्रॅम मेफेड्रोन (एम.डी) हा अंमली पदार्थ मिळुन आला. सदर मालासह मोबाईल व इतर असा एकुण ३,७८,४००/- रु किं चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन, सदर इमसाविरुध्द समर्थ पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १४६/२०२५, एन.डी.पी.ए अॅक्ट कलम ८ (क), २२ (ब) अन्वये गुन्हा दाखल करुन दाखल गुन्हयामध्ये सदर आरोपीस अटक करण्यात आले आहे.

सदरची कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त, आर्थिक व सायबर, पुणे शहर अति. कार्य गुन्हे, श्री. विवेक मासाळ, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे १ श्री. गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक, १ गुन्हे शाखा पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक श्री प्रशांत अन्नछत्रे, सहा पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, पोलीस अंमलदार विशाल दळवी, सचिन माळवे, संदिप शिर्के, प्रविण उत्तेकर, विनायक साळवे, दयानंद तेलंगे, सर्जेराव सरगर, सुहास डोंगरे, विपुन गायकवाड, संदेश काकडे, दत्ताराम जाधव, रेहाना शेख, स्वप्नील मिसाळ यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट