अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा, पुणे शहर दोडा चुरा व अफिमसह एका इसमास केले जेरबंद

0
Spread the love

पुणे

सह संपादक – रणजित मस्के

अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस अधिकारी व अंलदार असे गुन्हे प्रतिबंधात्मक, तसेच अंमली पदार्थाचे गैरव्यवहाराचे अनुषंगाने पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना यश कॉम्पलेक्स समोर, कामठे पाटील नगर, येवलेवाडी, सार्वजनिक रोडवर कोंढवा पुणे. येथे एक इसम नामे अर्जुन सुखराम काला वय ३१ वर्षे, रा. शिक्षक नगर, गल्ली नं ०२, फ्लॅट नं २०३, कामठे पाटील नगर, येवलेवाडी, पुणे त्याचे ताब्यामधुन एकुण ०५,१३,१६०/- रु.कि. चे २५६ ग्रॅम ५८ मिलीग्रॅम अफिम व २५,९२० /- रू.किं चे ०१ किलो ७२८ ग्रॅम अफीमची बोंडांची (पॉपी स्ट्रॉची पावडर व दोडा चुरा हा अंमली पदार्थ मिळुन आल्याने तो जप्त करण्यात आला असुन, त्याचे विरुध्द कोंढवा पोलीस ठाणे गु.र.नं.४१८/२०२५ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), १७ (ब), १५ (ब) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

वरील नमुद कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त, प्रशासन, पुणे शहर अतिरिक्त कार्यभार गुन्हे, पुणे शहर श्री. संजय पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, पुणे शहर श्री. निखील पिंगळे, मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे १, पुणे श्री. गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक, १ गुन्हे शाखा पुणे शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. उल्हास कदम, सहा. पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, पोलीस उप-निरीक्षक दिगंबर कोकाटे, पोलीस अंमलदार, संदिप शिर्के, विशाल दळवी, प्रविण उत्तेकर, संदेश काकडे, दत्ताराम जाधव, विपुन गायकवाड, स्वप्नील मिसाळ यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट