मुंबई गोवा रोड वर राॅग साईडने पिकअप टेम्पो चालवून डिव्हायडरला जोरदार ठोकर मारल्याने एका वयोवृद्ध महिलेचा जागीच मृत्यू ६ जण गंभीर जखमी…

0
Spread the love

उपसंपादक-राकेश देशमुख

महाड :- दिनांक २९ ऑक्टोबर २०२३ रोजी संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास फिर्यादी श्री. अरुण लक्ष्मण चोरगे रहाणार मुठवली, पो.सव, ता.महाड, जि.रायगड यांनी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की, .मौजे नडगाव गावचे हद्दीत, हाॅटेल लेमन लिला व शिवकृपा ट्रान्सपोर्ट च्या समोर, ता.महाड, जि.रायगड येथे भयानक अपघात होऊन मयत फुलावंती अशोक राउत वय ६० वर्षे हिचा जागीच मृत्यू होऊन ६ जण गंभीर जखमी झाले आहेत.

या घटनेची खबर मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अतिरिक्त कार्यभार महाड सहायक पोलीस निरीक्षक श्री. सुर्वे व पोलीस उपनिरीक्षक श्री. गायकवाड यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली.

यावेळी आरोपी अमोल अनंत रेशीम वय ३० वर्षे चालक याने त्याचाच ताब्यातील महेंद्रा पिकअप टेम्पो नंबर एम एच ०६ बी. जी.४२१६ याचे मागील हावदयामधये बेकायदेशीर रित्या कामगार इसमांना बसवून मुंबई गोवा महामार्गावरती गोवा लेनवर पोलादपूर बाजुकडुन मुंबई बाजुकडे राॅग साईडने पिकअप टेम्पो हयगयीने बेदरकारपणे रस्त्याचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करून अतिवेगाने चालवून रोडचे डिव्हायरडरने ठोकर मारुन अपघात करुन अपघातात पिकअप टेम्पो पलटी होऊन स्वताचे दुखापतीस तसेच पिकअप मधील कामगार रोडवर पडल्याने फुलावंती अशोक राउत वय ६० वर्ष हिचे मरणास तसेच इतर कामगार यांचे दुखापतीस कारणीभूत झाला म्हणून आरोपी विरोधात भारतीय दंड विधान कलम ३०४ (अ), २७९,३३७,३३८ मोटार वाहन कायदा कलम १८४,४(२)/१७७,६६(१),८४,१९२ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून याबाबतचा अधिक तपास पोलीस नाईक काळंगीरे, पोलीस हवालदार विनोद पवार करित आहेत.

या घटनेत १) सुहास साळवी,२)ज्ञानंदकुमार मेहता ३)नंदिनी पालव ४)शितल राउत ५) अरुण चोरगे ६) अमोल रेशीम सर्व रहाणार मुठवली, पो.सव,ता.महाड, जि.रायगड अशी जखमींची नावे आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट