सातारा पोलीसांकडून विभागातील अवैध धंद्याची माहिती पोलीसांपर्यंत पोहचवण्यासाठी दक्ष यंत्रणेचा शुभारंभ…

उपसंपादक-रणजित मस्के
सातारा :- जागरूक नागरिकांकडून अवैध धंद्याविषयी माहिती पोलीसांपर्यंत पोहचवणाऱ्या “दक्ष” यंत्रणेचा शुभारंभ सातारा जिल्हयातील अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन करण्यासाठी जागरूक, सुजाण, दक्ष नागरिकांकडून आपल्या परिसरातील अवैध धंद्यांविषयी माहिती सहजरित्या विनासायास पोलीसांपर्यंत पोहचविण्यासाठी सातारा जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख, व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल यांचे संकल्पनेतुन “दक्ष” व्हॉटसअप प्रणाली विकसीत करण्यात आलेली आहे.
सदर प्रणालीचा शुभारंभ आज रोजी होत आहे.”दक्ष” व्हॉटसअप प्रणालीमध्ये ९९२३२३४१०० हया क्रमांकावर नागरीकांनी सुरूवातीला Hi, Hello, Namste असे काहीही पाठविले तरी सदर प्रणाली सुरू होईल.


त्यानंतरच नागरीकांनी आपली तक्रार निवडावी व दिलेल्या पर्यायावर क्लीक करुन आपली तक्रार दाखल करावी.
सदर प्रणालीमध्ये नागरीकांनी तक्रार नोंदविल्यानंतर त्यांचे नाव व मोबाईल नंबर गोपनिय राहील. सदर प्रणालीचा मुख्य उद्देश हा सातारा जिल्हयातील अवैध शस्त्र, अवैध दारु, जुगार, अंमली पदार्थ, अवैध गुटखा, अवैध सावकारी व्यवसाय, अवैध वाळु वाहतुक व विक्री यांसारख्या इतर अवैध धंद्याची माहिती पोलीस यंत्रणेपर्यंत पोहचवुन अवैध धंद्यांवर प्रभावी कारवाई करणे शक्य होणार आहे.
सातारा पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख यांनी सातारा जिल्हयातील सुजाण नागरीकांना या सुविधेचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन केले आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com