अमरावती ग्रामिण पोलीसांची अमंली पदार्थ विरोधी दिनानिमीत्त जनजागृती

0
Spread the love

अमरावती

सह संपादक -रणजित मस्के

दि.२६ जुन हा जागतीक अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणुन संपूर्ण जगात पाळला जातो व त्यानिमित्ताने अंमली पदार्थांचे युवा पिढीवर होणारे दुष्परिणामाबाबत युवा पिढीमध्ये तसेच समाजाचे विविध घटकात वेग-वेगळया स्तरावर विविध माध्यमातुन जनजागृती करण्याबाबत शासनाकडुन व मा. पोलीस महासंचालक, म.रा. मुंबई कार्यालयाकडुन निर्देशित करण्यात आले होते.

त्यानुसार अमरावती ग्रामिण घटाकांतर्गत सर्व पोलीस स्टेशन हद्दीत शाळा व महाविद्यालयामध्ये विद्याथ्यांकरीता परिसंवाद/चर्चा सत्राच्या माध्यमातुन अमंली पदार्थाच्या दुष्परिणामाबाबत पोलीस अधिका-यां मार्फत तसेच समाजसेवी संस्था मार्फत मार्गदर्शन करण्यात आले. सर्व पो.स्टे. हद्दीत विद्यार्थ्यांची प्रभात फेरी तसेच युवक व प्रतिठित नागरीक यांची बाईक रॅली सुध्दा काढण्यात आली. अमंली पदार्थाच्या दुष्पपरिणाम केवळ स्वतःच्या शरिरावरच होत नसुन त्यामध्ये स्वतःचे कुटूंबसुध्दा भरडले जावुन उध्वस्त होते व त्यातुन समाजाला सुध्दा त्याचे दुष्परिणाम सहन करावे लागता त्यामुळे अश्या व्यसनापासुन दुर राहण्याचे व अश्या अवैध व्यवसायाबाबत काही माहीती पडताच कारावाईसाठी पोलीसां माहीती देण्याचे आवाहन यानिमीत्ताने विद्यार्थ्यांना व नागरीकांना करण्यात आले.

त्याचप्रमाणे जिल्हयात १० वर्षात अमंली पदार्थाच्या व्यवसायात समाविष्ठ असलेल्या आरोपींची यादी तयार करून अश्या ५७ आरोपीतांना प्रतिबंधक कारवाईसाठी पोलीस अधिक्षक कार्यालय येथे हजर ठेवण्यात आले. मा. पोलीस अधिक्षक यांनी त्यांना अशा अवैध व्यवसायापासुन दुर राहण्याचे व पुन्हा जर अशा व्यवसायात समावेश असल्याचे निर्दशनास आल्यास कठोरात कठोर कायदेशिर कारवाई करण्यात येईल अशी समज देण्यात आली.

सर्व नागरीकांनी विशेषतः तरूण पिढीने अमंली पदार्थाच्या व्यसनापासुन दूर राहण्याचे तसेच अमंली पदार्थाच्या अवैध व्यवसायाबाबत कुठलीही माहीती असल्यास त्वरीत पोलीसांना कळविण्याबाबत आवाहन पोलीस अधिक्षक श्री. विशाल आनंद यांचेकडुन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट