ऑनलाईन फसवणूक झालेली रक्कम रुपये ४,४५,११२/- परत करण्यात मिरा-भाईंदर वसई-विरार सायबर पोलीस ठाणेस मोठे यश !!

0
Spread the love

प्रतिनिधी- अक्षय कांबळे

मिरा-भाईंदर:-मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील विरार परिसरातील श्री. हेतल पटेल यांना यांची ऑनलाईन व्यवहारादरम्यान ४,४५, ११२/- रुपयाची फसवणूक केलेबाबत तक्रार सायबर पोलीस ठाणे येथे प्राप्त होती.

तसेच सदरबाबत विरार पोलीस ठाणे गुन्हा नोंद क्रमांक १०२५ / २०२३ भादंवि कलम ४२०, ३४ प्रमाणे गुन्हा नोंद आहे.
(सायबर पोलीस ठाणे आवक अर्ज क्रमांक – २५०८ – बी / २०२३ दि. १९/१०/२०२३)

          नमूद तक्रारीबाबत तात्काळ दखल घेवून तक्रारदार यांचे झाले व्यवहाराबाबत माहिती प्राप्त करण्यात आली. सदरचे सर्व व्यवहार इंडसइंड बँकेचे खात्यावर गेल्याचे दिसून आले. तात्काळ तक्रारदार यांचे फसवणूक रक्कमेबाबत Indusind Bank यांचेसोबत तात्काळ पत्रव्यवहार करून व सातत्यपुर्ण पाठपुरावा करून नमूद फसवणूक रक्कम थांबविण्यात आली व मा.हु. कोर्टाचे आदेशाने सदरची फसवणूक रक्कम तक्रारदार यांचे मुळ खात्यावर परत मिळविण्यात आली.

                                अशा प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी…
  • Online फसवणूकीसंदर्भातील कोणतेही एसएमएस, लिंकबाबत कोणत्याही प्रकारे सहभागी होवू नये. • आपले बँक खाते, जन्मदिनांक, OTP वा इतर वैयक्तीक माहीती देवू नये.
  • अनोळखी लिंक, अॅप्लीकेशन
    डाऊनलोड करू नये.
  • ऑनलाईन फसवणूक झाल्यास तात्काळ बँकेला संपर्क करावा. मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, अशा प्रकारे फसवणूक करणे कायदयाने गुन्हा आहे. असा प्रकार आपल्यासोबत घडला असल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस ठाणेस, सायबर गुन्हे कक्षास संपर्क साधावा. तसेच www.cybercrime.gov.in अथवा 1930 या हेल्पलाईनवर संपर्क साधून तक्रार द्यावी. सदरची कामगिरी श्री. अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), श्री. मदन बल्लाळ, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे), मि. भा.व. वि. पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. सुजितकुमार गुंजकर, सपोनि / स्वप्नील वाव्हळ, पोउपनिरी / प्रसाद शेनोळकर, पोअं/ १२०९२ प्रविण आव्हाड, मपोअं / १६१०६ सुवर्णा माळी, मपोअं/ १३०८७ अमिना पठाण पोअं/ २२००३ कुणाल सावळे, पोअं./२२०४० प्रशांत बोरकर यांनी पार पाडली आहे.</code></pre>सायबर पोलीस ठाणे व्हॉट्सअॅप हेल्पलाईन क्रमांक :- ९०० ४८८०१३५

सायबर पोलीस ठाणे ई-मेल आयडी :- cybercrime.mb vv@mahapolice.gov.in

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट