परदेशात नोकरीचे आमिष दाखवून देशभरातील बेरोजगारांची फसवणूक करणाऱ्या बनावट एम्लॉयमेंटचा पर्दाफाशमुंबई गुन्हे शाखा ८ ची कारवाई…

उपसंपादक-रणजित मस्के
मुंबई :- परदेशात नोकरीचे आमिष दाखवून देशभरातील बेरोजगार तरुणांना फसवणाऱ्या बनावट एम्लॉयमेंटचा पर्दाफाश करण्यात आला. क्रिष्णा कमलाकांत त्रिपाठी (वय ५२ वर्षे,
ऑफिसवर गुन्हे शाखा, मुंबई) असे आरोपीचे नाव असून, ही कारवाई मुंबई गुन्हे शाखा कक्ष ८ च्या पथकाने केली.
परदेशात नोकरी करण्यास इच्छुक असलेल्या बेरोजगार तरूणांची फसवणूक करण्याचे उद्देशाने ऑफिस नंबर ९२५, ९ वा. मजला, द सुमीत बिझनेस बे, पश्चिम द्रुतगती मेट्रो स्टेशन जवळ, अंधेरी (पूर्व), मुंबई या ठिकाणी E AXIS IMMIGRATION SERIVCES PVT. LTD. या नावाने बनावट ऑफिस सुरू करण्यात आले होते. नमूद ऑफिस मध्ये लोकांना परदेशात नोकरी देण्याचे आमिष दाखवून, त्यांच्याकडून मोठी रक्कम स्विकारून त्यांना बनावट वर्क परमिट लेटर देण्यात येत होते.
तसेच बेरोजगार तरूणांकडून घेतलेली रक्कम त्यांना परत न देता त्यांची फसवणूक करीत असल्याची माहिती कक्ष ८ ला मिळाली होती.
या माहितीची सत्यता कक्ष ८ ने पडताळल्यानंतर, बळीत बेरोजगार तरूणाने दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलीस ठाणे येथे गु.र.क्र. ५९९/२०२४ कलम ३१९(२), ३१८(४), ३३६(२), ३३६(३), ३४०(२), ६१(२) भा. न्या. सं. अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. नमूदचा गुन्हा पुढील तपासकामी कक्ष ८ येथे वर्ग करण्यात आला असून त्याची नोंद गु.प्र.शा., गु.र.क्र. ६८/२०२४ अन्वये घेण्यात आली आहे. कक्ष- ८ पथकाने नमूद गुन्ह्यात एक आरोपीतास ३० ऑगस्ट २०२४ रोजी अटक केली आहे. नमूद अटक आरोपीला ३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
गुन्हे शाखेच्या कक्ष ८ चे पथकाने नमूद बनावट ऑफिस येथे छापा टाकून व्होडाफोन कंपनीचे एकूण ४५ सिमकार्डस, जिओ कंपनीचे एकूण १० सिमकार्डस, ०८ लॅपटॉपस, ०१ डेस्कटॉप, ०२ मोबाईल फोनस, ०२ बनावट स्टॅम्प, रोख रक्कम १,२२,०००/-रु., व्हिजीटिंग कार्डस व इतर कागदपत्रे असे गुन्हयात वापरण्यात आलेले साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त (बृहन्मुंबई) विवेक फणसळकर, मा. विशेष पोलीस आयुक्त (बृहन्मुंबई), देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे), लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), शशि कुमार मीना, पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण-१), विशाल ठाकूर, सहाय्यक पोलीस आयुक्त (डीपश्चिम), राजेंद्र शिरतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष-८ चे प्रभारी पोलीस निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे, पोनि श्रीकांत इंगवले, सपोनि मनोजकुमार प्रजापती, सपोनि मधुकर धुतराज, सपोनि संग्राम पाटील, सपोनि राहुल प्रभु, पोउनि अरविंद मोरे, पोउनि विकास मोरे, सपोउपनि शिरसाट, पोह यादव, पोह कांबळे, पोशि रहेरे, पोशि सटाले, पोशि बिडवे, मपोशि भिताडे यांनी केली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com