आमगाव पोलीसानी गोंदिया, चंद्रपूर जिल्हयात तसेच छत्तीसगड, मध्यप्रदेश,ओरिसा राज्यात चोरी आणि बॅग लिफ्टिंग करणारी टोळी केली जेरबंद…

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :- आंतरराज्यीय चोरट्यांच्या टोळीचा पाठलाग करून तिघांना जेरबंद करत आवळल्या मुसक्या….दोघे गजाआड..
जिल्ह्यातील तसेच जिल्हा बाहेर, बाहेर राज्य, अश्या विविध ठिकाणी केलेल्या चोरीच्या गुन्ह्यांची उकल…

याबाबात थोड्क्यात हकीगत अशी की, दिनांक 17/10/24 रोजी आमगाव पोलीस स्टेशन येथील पो.उप नि.नरेश सहारे सोबत पो. स्टाफ आमगांव दाखल अप क्रं. 317/2024 कलम305 (अ), 331(3) बी.एन. एस. मधील आरोपी नामे- प्रविण अशोक डेकाटे रा. तिलक वार्ड, मोहाडी जि. भंडारा (ह.मु. रेल्वे क्रॉसिंग जवळ नवेगावबांध, यास भंडारा कारागृहातून आमगाव येथील गुन्ह्यात प्रोडक्शन वारंटवर भंडारा जेलमधुन ताब्यात घेवुन शासकिय वाहनाने सडक/अर्जुनी मार्गाने आमगांवकडे येत असतांना वाहनासमोर दुचाकीवर 3 इसम संशयास्पद दिसून आल्याने तसेच ते पो.स्टे चे दाखल अप क्रं. 483/2024 कलम 303 (2) मधिल आरोपी असल्याची खात्री पटल्याने पोशि मन्यार यांनी शासकिय वाहनातुन उतरुन मोटार सायकल तीन्ही इसमांचा पाठलाग केला असता मोटार सायकल वरील व्यक्ती /वाहन भरधाव वेगाने चालवल्यामुळे दुचाकी वरील संतुलन सुटल्याने त्यांची मो.सा.स्लीप झाली गाडी स्लीप झाल्यावर ते तिन्ही इसम पळुन जात असतांना आमगाव पोलीस पथक आणि डुग्गीपार पोलीस स्टाफ चे मदतीने डुग्गीपार येथे तलावाजवळ व जंगलात पाठलाग करून आरोपी ईसंम नामे –
1) देवा नागय्या पिटला वय 42 वर्षे
2) राजेश राजु पिटला वय 20 वर्षे तसेच
3) एक विधी संघर्ष बालक वय 12 वषें तिन्ही राहणारे – जिल्हा नेल्लुर (आंध्रप्रेश) अश्या तिघांना ताब्यात घेण्यात आले.
त्यांचेकडे असलेल्या साहीत्याची पाहणी केली असता त्यांचे ताब्यात युनिकॉर्न दुचाकी वाहन , दुचाकी वाहन तोडण्याचे लोंखडी साहित्य, रोख रक्कम 34,300/- रू* तसेच एक ओप्पो कंपनीचा मोबाइल असा मुद्देमाल मिळुन आल्याने हस्तगत करून गुन्ह्यांत जप्त करण्यात आले आहे…..त्यांचेकडे चोरीच्या ईतर गुन्ह्याचे अनुषंगाने सखोल अधिक ची चौकशी केली असता त्यांनी …
1) पो.स्टे.आमगांव जिल्हा गोंदिया अप क्र. 483/24 कलम 303 (2) बी.एन.एस. मध्ये गुन्हा केल्याचे कबुल केले. असून 1.5 लाख रुपये चोरल्याचे सांगितले आहे.
नमूद आरोपींनी या व्यतिरिक्त खालील प्रमाणे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे–👇
2) बिलासपुर जिल्हा तारबहार पोलीस स्टेशन अप.क्र. 270/24 कलम 303(2) बी.एन.एस. येथे 2.5 लाख रुपये
3) राजनंदगाव जिल्हा डोंगरगड पोलीस स्टेशन अप. क्र. 540/24 कलम 303(2) बी.एन.एस. मध्ये 2 लाख रुपये
4) जंजीर चंपा येथे 588/240 कलम 303(2) बी.एन.एस. 1.5 लाख रुपये
5) बालाघाट जिल्हा नवेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन अप. क्र. 210/24 कलम 303(2) बी.एन.एस. मध्ये 4.35 लाख रुपये
6) चंद्रपूर जिल्हा ब्रह्मपुरी पोलीस स्टेशन येथे अप. क्र. 455/24 कलम 303(2) बी.एन. एस. मध्ये 6.5 लाख रुपये
7) चंद्रपूर जिल्हा ब्रह्मपुरी पोलीस स्टेशन- 216/22 कलम 454, 380, 120 भा द वी*
8) बिलास्पुर जिल्हा कारभार पोलीस स्टेशन येथे अप क्र. 187/24 कलम 303(2) बी.एन. एस अन्वये. मोटर सायकल चोरी
9) भुवनेश्वर जिल्हा चंद्रपूर पोलीस स्टेशन अप क्र. 215/22 कलम 279 भा द वी मध्ये 1.5 लाख रुपये चोरी केल्याचे उघड झाले आहेत.
आरोपी क्र. 1 व 2 यांना गुन्ह्यांत अटक करण्यात आलेली असून विधी संघर्ष बालक यास बाल सुधार गृहात दाखल करण्यात आले आहे….आरोपी हे आंतरराज्यीय सक्रिय टोळीतील चोरटे असल्याने त्यांचेकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.. या अनुषंगाने मा. वरिष्ठांचे निर्देश सूचना मार्गदर्शनाखाली आमगाव पोलीस अधीकचा तपास करीत आहेत…
नमूद आरोपीतांची आंतरराज्यीय टोळी असून यांनी महाराष्ट्रात गोंदिया जिल्हयात आणि चंद्रपूर जिल्हयात तसेच छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि ओरिसा राज्यात चोरीचे आणि बॅग लिफ्टिंग चे मोठे मोठे गुन्हे केलेले आहेत.
सदरची प्रशंसनीय कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, यांचे निर्देशांन्वये उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग आमगाव श्री. प्रमोद मडामे, ठाणेदार आमगाव पो.नि. श्री. तिरुपती राणे यांचे मार्गदर्शनात पो. उप. नि. नरेश शहारे, पोलीस अंमलदार लिखिराम दसरे असीम मण्यार, अक्षय कवरे, यांनी आरोपी जेरबंद कऱण्यात अथक प्रयत्न परिश्रम घेतले तसेच अंमलदार राजु गजपुरे, नितिन चोपकर, विनोद उपराडे, चेतन शेंडे, राजेश चौधरी, योगेश मुनेश्वर यांनी तसेच डुग्गीपार येथील पोलीस पथकाने मोलाचे सहकार्य केले.
मा. वरिष्ठांनी आमगाव पोलीस पथकाने केलेल्या प्रशंसनीय कामगिरीचे कौतुक अभिनंदन केले आहे..
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com